How to become a millionaire in india by earning 1 lakh in germany
बर्लिन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. तसेच या व्हिसाचे नियमही अधिक कडक केले आहे. यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष करुन भारतीयांना याचा मोठा फटका बसला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे भारताच्या आयटी उद्योगांना आणि इतर व्यावसायिकांना अनेक अडचणीांचा सामना करावा लागत आहे.
पण याच वेळी जर्मनी भारतासाठी एक मोठी संधी घेऊन आला आहे. भारतातील जर्मन राजदूत फिलिप अकरमन यांनी भारतीय तरुणांना जर्मनीतील नोकऱ्यांचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांना भारतीय तरुणांना जर्मनीत आयटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.
H-1B Visa : एच-१बी व्हिसा नियमात आणखी एक मोठा बदल ; लॉटरी सिस्टिम बंद करणार ट्रम्प
अकरमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी भारतीयांनी जर्मनीत १ लाख कमवले तर, भारता ते करडोपती होतील असे सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, ‘मी भारतातील कुशल तरुणांना जर्मनीच्या स्थिर इमिग्रशन धोरणाचा, सुरक्षित वातावरण आणि नियमांचा फायदा घेण्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे भारतीय तरुणांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. जर्मनीलाही कुशल व्यावसायिकांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Here is my call to all highly skilled Indians. Germany stands out with its stable migration policies, and with great job opportunities for Indians in IT, management, science and tech. Find your way to Germany to boost your career: https://t.co/u5CmmrHtoF pic.twitter.com/HYiwX2iwME — Dr Philipp Ackermann (@AmbAckermann) September 23, 2025
सुरुवातील भारतीय रुपया युरोपीय रुपयांमध्ये कसा रुपांतिरत होते हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
जर्मन हा युरोमधील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था असणार देश आहे. येथे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी भारतीय रुपयो-युरोचा दर अत्यत महत्त्वाचा मानला जातो. यावरच तेथील राहणीमान अवबलूंन असते. आता हे कसे ते एका उदाहणातून समजून घेऊयात.
जर्मनीमध्ये महाविद्यालयात नोकरी करत असला तर तेथे तुम्हाला भारताच्या तुलनेत अधिक पगार मिळले. तसेच आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही जर्मनीमध्ये व्यक्तीला वार्षिक पगार हा ५० हजार युरो ते ६० हजार युरोपर्यंत असतो. यामुळे याचे भारतीय रुपयांमध्ये रुपांतर केले, तर मूल्य कोटींच्या बरोबरीचे होते. यामुळे जर्मनीत एक लाख कमवाल, तर भारतात करोडपती व्हाल असे म्हटले जाते.
यामुळे अमेरिकेच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीमुळे अनेक भारतीय तरुणांसाठी जर्मनी उत्तम पर्याय ठरु शकतो. राजदूत अरकमन यांनी देखी तरुणांना देशातील नोकऱ्या, स्थिर इमिग्रेशन, सुरक्षितात आणि करिअरच्या संधीचा वापर करण्याचे आव्हान केले आहे. तुम्हाा जर रुपया आणि युरोचा दर समजला तर पैशाचे व्यवस्थापन अगदी सोपे होईल आणि तुम्ही जास्त कमाई करु शकाल.
जर्मनीने भारतीयांना काय आवहान केले आहे?
जर्मनीचे भारतातील राजदूत फिलिप अकरमन यांनी भारतीय तरुणांना जर्मनीतील नोकऱ्यांचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांना भारतीय तरुणांना जर्मनीत आयटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीचा भारताला फायदा? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स