H-1B Visa : एच-१बी व्हिसा नियमात आणखी एक बदल ; लॉटरी सिस्टिम बंद करणार ट्रम्प (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
H-1B Visa : वॉशिंग्टन : मंगळवारी (२३ सप्टेंबर) ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाच्या निवड प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) H-1B बी व्हिसा च्या नियमप्रणालींमध्ये सुधारणा करत असून आता निवड प्रक्रियेत त्यांनी बदल केला आहे. H-1B व्हिसा हा व्हिसा लॉटरी सिस्टिम द्वारे दिला जात होता. पण आता ही सिस्टिम बंद करण्यात येणार असून केवळ जास्त पगार असलेल्या नोकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांनुसार, सर्व अर्जदाराांना चार श्रेणींमध्ये विभागले जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक पगार असलेल्यांना चार वेळा निवड प्रक्रियेत सहभागी होता येइल, तर कमी पगार असलेला उमेदवार एकच वेळी अर्ज करु शकतो. उदाहरणार्थ जर एका व्यक्तीचा वार्षिक पगार १,६२,५०० डॉलर्स (१.४४ कोटी रुपये) असेल तर त्याला चार वेळा H-1B व्हिसासाठी अर्ज करता येईल आणि कमी पगार असलेल्यांना केवळ एकच वेळा H-1B व्हिसाठी अर्ज करता येईल
ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीचा भारताला फायदा? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स
काय आहे ट्रम्प यांचा हेतू?
ट्रम्प यांच्या या निर्णयामागचा उद्देश देशात केवळ उच्च कौशल्यपूर्ण आणि उच्च पगार असलेल्यांना घेणे आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि आयटी क्षेत्राला फायदा होईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव फेडरल रजिस्टरमध्ये जाहीर करण्यात आला आहे. येत्या ३० दिवस यावर लोकांची प्रतिक्रिया घेण्यात येणार आहे. त्यानंतर फेडरल रजिस्टरकडून मंजुरी मिळाल्यानंतप एप्रिल २०२६ पासून हा नियम लागू केला जाणार आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कात वाढ केली आहे. यासाठी लोकांना १ वाख अमेरिकन डॉलर म्हणूजे ९० लाख रुपये अर्जदाराला मोजावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका लहान कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. विशेष करुन भारतीयांवर याचा सर्वाधिक परिणा होईल.
कारण अनेक भारतीय आयटी कंपन्या (TCS, Infosis,Vipro) एंन्ट्री लेव्ह आमि कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत पाठवतात. पण ट्रम्प यांच्या या निर्यामुळे यामध्ये मोठा अडथळा निर्माण होणार आहे. गुगल मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन यांसरख्या मोठ्या कंपन्यांना जास्त पगाराच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतात यामुळे त्यांना याचा फायदा होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा प्रणाली आणखी कोणता बदल केला?
H-1B व्हिसा हा पूर्वी लॉटरी सिस्टिमवर आधारित होता, आता यामध्ये बदल करण्यात आला असून केवळ जास्त पगार असलेल्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
या निर्णयाचा भारतीयांवर काय परिणाम होणार?
ट्रम्प यांच्या या नव्या नियमामुळे गुगस, मायक्रोसॉफ्ट यांसरख्या मोठ्या कंपन्यांना तर फायदा होईल, मात्र TCS, Infosis,Vipro यांसारख्या कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत पाठवण्यात अडचणी येतील. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणा होईल
Explainer: ट्रम्पच्या नव्या आदेशाने भूकंप, सर्व H-1B विसाधारकांचे शुल्क 1 लाख अमेरिकी डॉलर असणार?