How will India benefit from the US-Iran deal Read in detail
वॉशिग्टन/ तेहरान: सध्या इराण आणि अमेरिकेत दीर्घ शाब्दिक युद्धानंतर ओमानमध्ये चर्चा सुरु झाली आहे. इराणच्या अणु प्रकल्पासंबंधी ही चर्चा होत असून संपूर्ण जगाचे लक्ष या चर्चेकडे लागलेले आहे. ही चर्चा शांतते पार पडल्यास मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित होऊ शकते. सध्या अमेरिका-इराणमध्ये संघर्ष सुरु आहे. परंतु या दोन्ही देशांच्या चांगल्या संबंधाचा फायदा भारताला होउ शकतो. भारताचे दोन्ही देशांशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ आहेत.
ही चर्चा यशस्वी ठरल्यास अमेरिका इराणवरील सर्व निर्बंध हटवेल. यामुळे भारताचा इराणकडून स्वत दरात तेल आयात करण्याचा मार्ग मोकळा होईल. याच वेळी भारताने इराणच्या चाबहार बंदरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळे यावरील निर्बंध हटवण्यात आल्यास या बदरातून व्यापर वाढेल आणि याचा थेट फायदा भारताला होण्याची शक्यता आहे. सध्या भारताने दोन्ही देशांच्या बाजून न राहता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ही चर्चा अयशस्वी झाल्यास भारतासाठी कोणा एकाच्या बाजूने भूमिका घेणे कठीण होईल.
शिवाय दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सांगितले होते की, इराणवर कोणत्याही देशाने हल्ला केल्यास रशिया इराणला पाठिंबा देईल आणि हल्ला करण्यास संपुष्टात आणले जाईल. रशियादेखील भारताचा चांगला मित्र असल्याने भारतासाठी ही परिस्थिती अधिकच कठीण होईल. यामुळे भारताचे रशियासोबतही संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये ओमानच्या मध्यस्थीने चर्चा सुरु आहे. परंतु ट्रम्प यांनी इराणला थेट चर्चा करण्याची ऑफर दिली आहे. ट्रम्प यांी इराणला धमकीही दिली आहे की, इराणने थेट चर्चा करण्यास सहमती दर्शवली नाही, तर त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात येईल. परंतु इराणच्या म्हणण्यानुसार, ही चर्चा अप्रत्यक्षपणे झाल्याचे दिसून आले आहे.
सध्या इराण आणि अमेरिकेत इराणच्या अणु प्रकल्पासंबंधी चर्चा सुरु आहे. अमेरिका इराणच्या अणु कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी करार करु इच्छित आहे. यापूर्वी देखील अमेरिकेने इराणसह असाच एक करारा केला होता. ट्रम्प यांच्या मते, इराणचा अणु प्रकल्प मानवतेसाठी विनाशाचे कारण ठरु शकतो, परंतु इराणने स्पष्ट केले आहे की त्यांचा हा अणु कार्यक्रम शांतता उर्जेच्या वापरासाठी आहे.
इराण आणि अमेरिकेतील संबंधाचा फायदा केवळ बारतालाच नव्ह तर मध्ये पूर्वेतील देशांना देखील होऊ शकतो. भारतासाठी याचा मोठा फायदा आहे कारण, दरवर्षी लाखो लोक रोजगाराच्या शोधात मध्ये पूर्वेत जातात. शिवाय, मोठ्या संख्येने भारतातील लोकांचे इराणमध्ये व्यावसाय आणि काम आहे. तसेच दरवर्षी शिया यात्रेसाठी लाखो भारतीय मुस्लिम इराणला जातात. यामुळे भारतला कोणा एकाच्या बाजूने भूमिका घेणे कठीण जाईल, म्हणून अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेला करारा शांततापूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे.