Syria Civil War: सीरियात पुन्हा वर्चस्वाची लढाई सुरु; नवीन सरकार आणि लष्करासाठी धोक्याची घंटा? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दमास्कस: सीरियामध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. हिजबुल्लहाने सीरियामध्ये घुसखोरी करत पुन्हा एखदा नवीन सरकार विरोधात बंड पुकारला आहे. 12 एप्रिल रोजी HTS चे नवे सैन्य आणि हिजबुल्लाहच्या लढवय्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. हिजबुल्लाहने पुन्हा एकदा सीरियात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे सध्या सीरीयाचे नवे सरकार अलर्ट मोडवर आहे. सध्या हिजबुल्लाहने सीरियाच्या अनेक भागांवर ताबा मिळवला आहे.
हिजबुल्लाहला इराणकडून मोठ्या शस्त्रास्त्रांचा पाठिंबा मिळत आहे. अनेक पुरवठ्याचे मार्ग हिजबुल्लाहच्या नियंत्रणाखाली आले आहेत. यामुळे नव्या सीरियान सैन्याने हिजहुल्लहा विरोधात लष्करी कारवाई सुरु केली आहे. यामध्ये सीरियाच्या सैन्याने हिजबुल्ल्हाच्या तळांवर जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत हिजबुल्ल्हाने देखील सीरियन लष्करी ताफ्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
पुन्हा एकदा सीरियात वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. एकेकाळी हिजबुल्लाहचा सीरियामध्ये मोठा प्रभाव होता. परंतु अल-जुलानी नेतृत्वाखाली असलेल्या हयात-तहरीर अल-शाम (HTS) या गटाने हिजबुल्लावर हल्ले करुन सीरियामधून माघार घेण्यास भाग पजले. याच दरम्यान दुसऱ्या बाजूला इस्त्रायल- हिजबुल्लाहमध्ये देखील युद्ध सुरु झाले होते. यामुळे हिजबुल्लाह कमकुवत होत गेला आणि सीरियातील त्यांचे वर्चस्व संपुष्टात आहे.
दरम्यान पुन्हा एकदा हिजबुल्लाहने सीरियामध्ये आपली घुसखोरी सुरु केली आहे. हिजबुल्लाह प्रमुख नईम कासिम यांनी सुमारे 2 हजार सैनिक सीरियामध्ये पाठवले आहे. या सैनिकांनी सीरियाच्या वेगवेगळ्या भागांंमध्ये तैनात करण्यात आले आहे. या सैनिकांनी शस्त्र पुरवठ्याचे मार्ग ताब्यात घेतले आहे. यामुळे सीरियाच्या सार्वभौमत्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
HTS चे प्रमुख अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आणि लष्कर स्थापन करण्यात आले आहे. परंतु, नवे सीरियन सेना हिज्बुल्लाहला रोखण्यात अपयशी ठरली, तर हिज्बुल्लाह पुन्हा एकदा सीरियामध्ये शक्तिशाली बनू शकतो. ही स्थिती सीरियन सरकारसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सध्या सुरू असलेला हा संघर्ष केवळ दोन गटांमधील नाही, तर सीरियाच्या स्थिरतेसाठी एक मोठे संकट ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताची हवाई ताकद वाढणार; तयार करणार स्वदेशी लढाऊ विमाने