Human skin Teddy Bear Found on California's road
ॲनाबेल, तात्या विंचू या बाहुल्यांची दहशत आधीच लोकांमध्ये पसरलेली होती. अशातच यामध्ये आणखी एका ह्यूमन स्किन टेडी च्या दहशतीची भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर मानवी कातडी असलेला, रक्ताने माखलेला एक बाहुला सापडला आहे.
यानंतर संपूर्ण कॅलिफोर्नियात एकच खळबळ उडाली आहे. हा बाहुला एखाद्या भयावह चित्रपटातील दृश्यासारखा दिसत आहे. एकदम भयानक, रहस्यमयी आणि अगदी मानवी बाळाच्या रुपासारखा दिसत आहे. याचे फोटो सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वेगाने व्हायरल होत आहे.
ही घटना कॅलिफोर्नियाच्या बेअर बस स्टॉपजवळ घडली आहे. लोकांना फूटपाथवर एक भयावह बाहुला पडलेला दिसला. हा बाहुला अक्षरश: रक्ताने माखलेला होता. मानवी कातडीपासून शिवलेला दिसत होता. त्याचे डोळे फाडून काढल्यासारखे, तर त्याचे ओठ आणि नाक मानवासारखे दिसत होते. एखद्या भयपटातील बाहुल्यापेक्षाही भयानक बाहुला दिसत होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात बंदोबस्त केला आणि तातडीने त्या बाहुल्याला फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर बाहुला कोणी ठेवला, नेमका याचा हेतू काय होता या सर्व गोष्टींचा तपास करण्यात आला . हा एखाद्या गुन्ह्याचा भाग असू शकतो किंवा मानसिकतेने त्रस्त असलेल्या व्यक्तीने हे केले असावे अशा चर्चा रंगल्या होत्या.
BREAKING – A teddy bear believed to be wrapped in crudely stitched human skin was discovered today at a Victorville, California gas station. The Victorville coroner’s office is actively investigating this unsettling find. pic.twitter.com/TNvupolo7K
— Right Angle News Network (@Rightanglenews) July 14, 2025
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, हा बाहुला मानवी कातडी पासून बनवलेला नाही. तर लेटेक्स आणि सिंथेटिक मटेरिलपासून बनवला आहे. पोलिसांनी तपासात आढळून आले की, दक्षिण कॅरिलानतील कलाकार रॉबर्ट केलीने हा टेडी बनवला आहे. त्याने लेटेक्स आणि सिंथेटीक मटेरियलपासून ही भयावह कलाकृती तयार केली आणि Esty वर विक्रिसाठी ठेवली आहे. रॉबर्ट केली ने पोलिसांनी सांगितले की, त्याचा लोकांना घाबरवण्याचा कोणताही हेतू नव्हता, तर आपली कला जगासमोर आणण्याचा होता. त्याने या बाहुल्याचे नाव ह्यूमन स्किन टेडी असे ठेवले आहे. सध्या सोशल मीडियावर याला खूप पसंती मिळत आहे.