Hundreds of Pakistanis trapped in online scam in Myanmar
इस्लामाबाद: म्यानमारच्या सीमावर्तीत भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो पाकिस्तानी तरुण ऑनलाइन घोटाळ्यात अडकले आहेत. या पाकिस्तानी तरुणांना आकर्षक नोकऱ्यांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सायबर गुन्ह्याचे काम करुन घेण्यात आले. या घोटाळा केंद्राचे उद्दिष्ट जगभरातील लोकांकडून अब्जावधी डॉलर्सची फसवणूक करणे होता. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या तरुणांना थायलंडमध्ये नोकऱ्यांचे आमिष दाखवून त्यांना थायलंडच्या सीमेजवळील सक्तीच्या कामगार छावण्यांमध्ये पाठवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे पासपोर्ट आणि मोबाईल फोन जप्त करुन त्यांच्याकडून फसव्या क्रेडिट कार्ड योजना, ऑनलाईन घोटाळे आणि क्रिप्टोकरन्सी सारखे बेकायदेशीर काम करुन घेण्यात आले. या तरुणांना बाहेरील जगाशी कोणाताही संपर्क करता येणे कठीण झाले होते, कारण त्यांचे फोन आणि पासपोर्ट सर्वकाही जप्त करण्यात आले होते.
मानसिक आणि शारिरीक छळ
या तरुणांना शारिरीक आणि मानसिक छळालाही सामोरे जावे लागले. तरुणांना पगाराशिवाय जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडण्यात आले. तसेच त्यांच्या कुटूंवाशी कोणत्याही प्रकाराच्या संपर्कापासून दूर ठेवले होते. यामुळे त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली होती.
मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, मान्यमारमधील 1 लाख 20 हजाराहून अधिक घोटाळ्यांच्या क्रेंद्रामध्ये लोक काम करत आहेत. यामध्ये बहुतांश चिनी तरुणांचा समावेश आहे. ही घोटला केंद्र सोशल मीडियाद्वारे प्रेमसंबंध किंवा गुणंतवूकीद्वारे लोकांना फसवतात. या टोळ्या लोकांना जास्त पगाराचे आमिष दाखवून त्यांच्या इच्छेविरुद्ध सायबर गुन्हे करवतात.
या सक्तीच्या कामगारांना अशा ठिकाणांहून वाचवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहे. यापैकी काही पाकिस्तीनी तरुणांनी बेकायदेशीरपणे नदी ओलांडून जाऊन थायलंडला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यातील काही तरुणांचा नहीत बुडून मृत्यू झाला तर काहीजण थायलंडला पोहोचण्यात यशस्वी झाले. वाचलेल्या तरुणांना सुरक्षितपणे मायदेशी पाठवण्य़ात आले आहे.
पाकिस्तानी सरकारचा हस्तक्षेप
थायलंडच्या पाकिस्तानी दूतावासाने मान्यमारमध्य़े अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. सीनेट उपाध्यक्ष सैयदाल खान नासिर यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पंतप्रदान शहबाज शरीफ यांच्यापर्यंत हा मूद्दा पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.
शिवाय, थायलंडमधील पाकिस्तीनी समुदायाने देखील अडकलेल्या युवकांसाठी मोठी मदत केली आहे. फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेने त्यांच्या निवास, भोजन आणि आवश्यक गरजेची मदत पुरवली आहे. पाकिस्तानी राजदूतांनी आणि सीनेटच्या उपाध्यक्षांनी या युवकांच्या धैर्याचे आणि मदत करणाऱ्या समुदायाचे आभार मानले.