Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

9/11 हल्ल्याशी संबंधित अमेरिकाचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

अमेरिकेतील 9/11 हल्ल्याचा मुख्य सूत्रधार खालिद शेख मोहम्मद याच्याशी संबंधित न्यायालयीन प्रक्रियेत काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मोहम्मद आणि त्याच्या दोन सहआरोपींच्या मृत्यूदंडाची शिक्षा कायम राहणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2025 | 03:50 PM
9/11 हल्ल्याशी संबंधित अमेरिकाचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

9/11 हल्ल्याशी संबंधित अमेरिकाचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेतील 9/11 हल्ल्याचा मुख्य सूत्रधार खालिद शेख मोहम्मद याच्याशी संबंधित न्यायालयीन प्रक्रियेत काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाने कोलंबिया जिल्ह्यातील संघीय अपीलीय न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून यामध्ये मोहम्मद आणि त्याच्या दोन सह-आरोपींच्या दोष स्वीकारण्याच्या याचिकेवर स्थगिती देण्याची विनंती केली आहे. या याचिकेच्या स्वीकारामुळे त्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेतून सुटका मिळू शकली असती असे म्हटले जात आहे.

न्याय विभागाच्या या प्रतिज्ञापत्रानुसार, जर हे दोष स्वीकारले गेले असते, तर सरकारला सार्वजनिक सुनावणी आणि या गंभीर गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची मागणी करण्याची संधी मिळाली नसती. बचाव पक्षाने या याचिकेवर चर्चा केली होती, परंतु नंतर ती नाकारण्यात आली. आरोपींच्या वकिलांनी दावा केला आहे की, ही चर्चा कायदेशीर होती आणि ती मान्य केली पाहिजे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जगाच्या इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध महामारी; 14 व्या शतकात तीन खंडांमध्ये झाला होता विध्वंस

आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, 9/11 हल्ल्यात मृत्यू पावलेल्या सुमारे 3,000 लोकांच्या काही कुटुंबीयांनी क्यूबातील ग्वांतानामो बे येथील अमेरिकी नौदल तळावर मोहम्मदच्या दोष स्वीकारण्याच्या याचिकेवर सुनावणीसाठी उपस्थिती लावली. या समझोत्याबाबत कुटुंबीयांमध्ये मतभेद आहेत. तर काहींनी या दीर्घकाळ चाललेल्या न्यायप्रक्रियेसाठी हे सर्वोत्तम समाधान असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी खटला चालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हल्ल्यात 3,000 लोकांचा मृत्यू 

खालिद शेख मोहम्मद हा 9/11 हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानला जातो. 2003 साली पाकिस्तानमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सीआयएच्या गोपनीय ठिकाणी त्याची चौकशी करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यामध्ये न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि सुमारे 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

2024 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा माफ

2024 मध्ये, अमेरिकी संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी मोहम्मद आणि त्याच्या दोन सहआरोपींशी झालेल्या याचिकेला रद्द केले, यामुळे त्यांच्या मृत्युदंडाची शिक्षा पुन्हा बहाल झाली. या निर्णयामुळे हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखवल्या गेल्या. सध्याच्या घडामोडींमध्ये, बायडेन प्रशासनाने संघीय अपीलीय न्यायालयाला विनंती केली आहे की, मोहम्मद आणि त्याच्या सहआरोपींच्या दोष स्वीकारण्याच्या प्रक्रियेवर स्थगिती द्यावी, यामुळे मृत्युदंडाची शिक्षा कायम राहील. या प्रकरणातील न्यायप्रक्रिया आणि संबंधित घडामोडी भविष्यातही चर्चेचा विषय राहतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युरोपीय निवडणुक प्रक्रियेत एलॉन मस्कचा हस्तक्षेप; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

Web Title: Important developments on 911 attacks in the united states know the details nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Joe Biden
  • US
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.