Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Imran Khan: ‘Absolutely Not’ चा बदला! अमेरिकेनेच केला इम्रान खान यांचा पत्ता कट; CIAच्या कारस्थानाचा जिवंत पुरावा लीक

Imran Khan : इम्रान खान यांना सत्तेवरून हटवण्याच्या परकीय कटाचे सिद्धांत पुन्हा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानचा एक गुप्त दस्तऐवज लीक झाला असून, त्यात अमेरिकेचे अधिकारी डोनाल्ड लू यांच्यातील संभाषणाचा तपशील आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 18, 2026 | 03:50 PM
imran khan ouster cypher document leak us involvement donald lu secret deal

imran khan ouster cypher document leak us involvement donald lu secret deal

Follow Us
Follow Us:
  • ‘सायफर’ दस्तऐवज लीक
  • अमेरिकेची उघड नाराजी
  • लष्कराची गुप्त खेळी व आयएमएफ डील

Imran Khan Cypher Document Leak 2026 : पाकिस्तानच्या राजकारणात आणि जागतिक मुत्सद्देगिरीत एका अत्यंत संवेदनशील आणि वादळी प्रकरणाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. पाकिस्तानचे माजी माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांना एप्रिल २०२२ मध्ये अविश्वास ठरावाद्वारे सत्तेवरून बेदखल करण्यात आले होते. “माझे सरकार पाडण्यामागे अमेरिकेचा हात आहे,” असा आरोप इम्रान खान सुरुवातीपासूनच करत आले आहेत. आता याच दाव्याला भक्कम करणारा एक अत्यंत गुप्त आणि अधिकृत दस्तऐवज (Cypher Document) आंतरराष्ट्रीय मीडिया वेबसाइट ‘ड्रॉप साईट’ने लीक केला आहे. या अहवालामुळे वॉशिंग्टनपासून ते इस्लामाबादपर्यंत एकच खळबळ उडाली असून, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय आहे त्या गुप्त संभाषणात? ‘डोनाल्ड लू’ यांचे ते वक्तव्य!

लीक झालेला हा दस्तऐवज म्हणजे पाकिस्तानचे अमेरिकेतील तत्कालीन राजदूत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोनाल्ड लू (Donald Lu) यांच्यातील थेट संभाषणाची अधिकृत नोंद आहे. हे संभाषण इम्रान खान यांच्याविरोधात संसदेत अविश्वास ठराव आणण्याच्या अवघ्या काही दिवस आधी झाले होते. या दस्तऐवजात डोनाल्ड लू यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, जर इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव यशस्वी झाला, तर अमेरिकेकडून “सर्व काही माफ केले जाईल” आणि दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होतील. याचा सरळ अर्थ असा काढला जात आहे की, जोपर्यंत इम्रान खान पंतप्रधानपदावर राहतील, तोपर्यंत अमेरिका पाकिस्तानला धडा शिकवत राहील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

सीआईए प्रमुखांचा अपमान आणि ड्रोन तळाचा वाद

अमेरिका आणि इम्रान खान यांच्यातील संबंध इतके ताणले जाण्यामागे काही महत्त्वाची कारणे होती. जून २०२१ मध्ये, अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’चे (CIA) संचालक विल्यम बर्न्स हे अत्यंत गुप्त दौऱ्यावर पाकिस्तानात आले होते. अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य माघारी घेतल्यानंतर, तेथे लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानात ड्रोन आणि लष्करी तळ हवे होते. मात्र, इम्रान खान यांनी एका आंतरराष्ट्रीय मुलाखतीत स्पष्टपणे “Absolutely Not” (कदापि नाही) असे म्हणत अमेरिकेला लष्करी तळ देण्यास नकार दिला. इतकेच नाही तर, सीआयए प्रमुखांनी भेटीसाठी दिवसभर वाट पाहिली, पण इम्रान खान यांनी राजनैतिक प्रोटोकॉलचे कारण देत त्यांना भेटण्यास नकार दिला. यामुळे बिडेन प्रशासन कमालीचे दुखावले गेले होते.

📃The original copy of Pakistani cypher:- Cable I-0678, the document that triggered the removal of former Pakistan 🇵🇰Prime Minister Imran Khan as per order from USA. Credits: Dropsite pic.twitter.com/d69tCmpZxO — THE UNKNOWN MAN (@Theunk5555) May 18, 2026

credit – social media and Twitter

रशिया दौरा आणि युक्रेन युद्धातील भूमिका

फेब्रुवारी २०२२ मध्ये ज्या दिवशी रशियाने युक्रेनवर लष्करी आक्रमण केले, अगदी त्याच दिवशी इम्रान खान हे मॉस्कोमध्ये रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेत होते. अमेरिकेने ही भेट रद्द करण्यासाठी पाकिस्तानवर प्रचंड दबाव आणला होता, परंतु इम्रान यांनी अमेरिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) रशियाविरुद्ध आणलेल्या ठरावावर मतदान करतानाही पाकिस्तान तटस्थ राहिला. इम्रान खान यांचे हे स्वतंत्र, स्वाभिमानी आणि रशिया-चीनच्या बाजूने झुकलेले परराष्ट्र धोरण अमेरिकेच्या साम्राज्यवादी मानसिकतेला सहन झाले नाही, आणि येथूनच त्यांची राजवट संपवण्याच्या कटाची पायाभरणी झाली, असे या लीक अहवालातून स्पष्ट होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Politics: ब्रिटनमध्ये सर्वात मोठं राजकीय संकट! निवडणुकीत सत्तेचा पत्ता कट, ‘Epstein Files’च्या वादळात अडकले PM Keir Starmer

पाकिस्तानी लष्कराची गुप्त ‘डील’ आणि युक्रेनला शस्त्रपुरवठा

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे, इम्रान खान सत्तेत असतानाच पाकिस्तानी लष्कराचे बडे अधिकारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या थेट आणि गुप्त संपर्कात होते. लष्कराने २०२१ मध्येच वॉशिंग्टनमध्ये एका प्रभावी लॉबिस्टची नियुक्ती केली होती. इम्रान खान यांची हकालपट्टी होताच, पाकिस्तानचे नवीन सरकार तातडीने अमेरिकेच्या दबावाखाली आले. अहवालानुसार, पाकिस्तानने युक्रेन युद्धासाठी गुप्तपणे मोठ्या प्रमाणावर दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. याच लष्करी मदतीच्या बदल्यात अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला (IMF) सांगून पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे बेलआउट पॅकेज मंजूर करून दिले. सध्याचे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर हे आता अमेरिकेचे अत्यंत जवळचे मित्र मानले जातात, ज्यांच्या काळात चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचे (CPEC) काम कमालीचे मंदावले आहे.

Web Title: Imran khan ouster cypher document leak us involvement donald lu secret deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • America
  • Imran khan
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Tennessee Death Penalty: 2 प्राणघातक इंजेक्शन्सनंतरही जिवंत राहिली महिला; वाचा 207 वर्षांनंतरची ऐतिहासिक फाशी कशी टळली?
1

Tennessee Death Penalty: 2 प्राणघातक इंजेक्शन्सनंतरही जिवंत राहिली महिला; वाचा 207 वर्षांनंतरची ऐतिहासिक फाशी कशी टळली?

PTI Long March: 4 ऑक्टोबरला पाकिस्तानात मोठ्या गृहयुद्धाचा इशारा; इम्रान खान यांचा पक्ष अन् शहबाज सरकार आमनेसामने
2

PTI Long March: 4 ऑक्टोबरला पाकिस्तानात मोठ्या गृहयुद्धाचा इशारा; इम्रान खान यांचा पक्ष अन् शहबाज सरकार आमनेसामने

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश
4

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.