Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘न्यायाधीशांना लाज वाटली पाहिजे’, Imran Khan यांचा संयम सुटला; पाकिस्तानी न्यायव्यवस्थेची लाजीरवाणी अवस्था दाखवली जगाला

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यायाधीशांवर गंभीर आरोप केले आहेत. आपला मुलगा कासिम याच्याशी बोलताना इम्रान म्हणाले, "येथील न्यायाधीशांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी विकली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 23, 2026 | 01:20 PM
imran khan slams pakistan judges conscience sold bushra bibi jail update 2026

imran khan slams pakistan judges conscience sold bushra bibi jail update 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • न्यायालयीन व्यवस्थेवर प्रहार
  • कौटुंबिक छळाचा आरोप
  • मुलांच्या भेटीत अडथळे.

Imran Khan attack on Pakistan Judges : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पीटीआय’ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran khan) सध्या रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये बंद आहेत. मात्र, तुरुंगाच्या भिंतीही त्यांचा आवाज दाबू शकलेल्या नाहीत. नुकताच ईदच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या मुलांशी फोनवरून संवाद साधला आणि या संवादादरम्यान त्यांनी पाकिस्तानी न्यायव्यवस्थेवर जे ताशेरे ओढले आहेत, त्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. “न्यायाधीशांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी आणि आत्मा विकला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

न्यायाधीशांवर हल्लाबोल: “अल्लाहच्या घरात न्याय मिळेल!”

इम्रान खान यांनी आपल्या मुलाशी, कासिमशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानमधील न्यायाधीश आता स्वतंत्र राहिलेले नाहीत. त्यांच्या मते, न्यायदान करण्याऐवजी न्यायाधीश केवळ तारखांवर तारखा देत आहेत आणि जाणूनबुजून प्रकरणांना विलंब लावत आहेत. इम्रान खान यांच्या मते, न्यायाधीशांनी त्यांच्या विशेषाधिकारांसाठी सत्याची साथ सोडली आहे. त्यांनी अत्यंत भावनिक होऊन म्हटले की, “या लोकांना लाज वाटली पाहिजे, पण हरकत नाही, अल्लाहच्या घरात सर्वांना न्याय मिळेल.” पाकिस्तानच्या इतिहासात एखाद्या माजी पंतप्रधानाने थेट न्यायमूर्तींवर अशा प्रकारे जाहीर टीका करण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House: अमेरिकेत शटडाउनने उडाली धांदल; ट्रम्प म्हटले, ‘इराणची डोकेदुखी संपल्यावर, देशातील ‘या’ शत्रूला ठेचणार’

पत्नी बुशरा बीबी यांचा छळ: ब्लॅकमेलिंगचा आरोप

इम्रान खान केवळ स्वतःच्या अटकेमुळे चिंतेत नाहीत, तर त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्यासोबत होणाऱ्या वागणुकीमुळे ते अधिक संतप्त आहेत. खान यांनी आरोप केला की, “मला मोडणे सरकारला शक्य नाही, म्हणून ते माझ्या पत्नीचा वापर करून मला ब्लॅकमेल करत आहेत.” बुशरा बीबी यांना एकांतात ठेवले जात असून त्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्त्रिया आणि वृद्धांना त्रास देणे हे इस्लामच्या तत्त्वांविरुद्ध असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला आरसा दाखवला आहे.

Judges in Pakistan have sold their souls to the Asim law. I’ve lost all hope in the judiciary of this country the very institution meant to protect its people now feels hollow.
And shame on @MaryamNSharif as Adiala Jail falls under her authority, yet another woman, Bushra Bibi… https://t.co/OGJYgx8kG6 pic.twitter.com/O5Z5MMYGND
— Sidra’s (@zeeshanakhtar06) March 22, 2026

credit – social media and Twitter

मुलांच्या भेटीचा पेच: पासपोर्टचे राजकारण

इम्रान खान यांची मुले कासिम आणि सुलेमान सध्या लंडनमध्ये राहतात. त्यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. मात्र, पाकिस्तानी सरकार त्यांना ब्रिटिश पासपोर्टवर पाकिस्तानात येण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहे. सरकारच्या मते, त्यांनी पाकिस्तानी पासपोर्टवरच यावे. इम्रान खान यांच्या माजी पत्नी जेमिना गोल्डस्मिथ यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुलांची वडिलांशी भेट होऊ नये यासाठी हे मुद्दाम केले जात असल्याचा संशय इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War III : ‘सापाला डोकं वर काढू देऊ नका’; इराणला चारीमुंड्या चीत करण्यासाठी ट्रम्पसोबत आखाती देशांचीही ‘फिल्डिंग’

पाकिस्तानमध्ये भविष्यात काय होणार?

इम्रान खान यांच्या या विधानामुळे पाकिस्तानमधील राजकीय ध्रुवीकरण अधिक तीव्र झाले आहे. एकीकडे त्यांचे समर्थक याला क्रांतीचा आवाज मानत आहेत, तर दुसरीकडे सरकार आणि न्यायपालिका या टीकेला न्यायालयाचा अवमान मानण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये सध्या आर्थिक मंदी आणि राजकीय अस्थिरता असताना इम्रान खान यांनी तुरुंगातून सुरू ठेवलेला हा लढा सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इम्रान खान यांनी न्यायाधीशांवर कोणता मुख्य आरोप केला आहे?

    Ans: इम्रान खान यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानी न्यायाधीशांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी विकली असून ते जाणूनबुजून प्रकरणांना विलंब लावून न्याय नाकारत आहेत.

  • Que: इम्रान खान यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानी न्यायाधीशांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी विकली असून ते जाणूनबुजून प्रकरणांना विलंब लावून न्याय नाकारत आहेत.

    Ans: इम्रान खान यांची मुले ब्रिटिश पासपोर्टवर पाकिस्तानला येऊ इच्छितात, मात्र सरकार त्यांना केवळ पाकिस्तानी पासपोर्टवर येण्याची सक्ती करत आहे, ज्यामुळे त्यांच्या भेटीत अडथळे येत आहेत.

  • Que: बुशरा बीबी यांच्याबद्दल इम्रान खान यांनी काय म्हटले?

    Ans: इम्रान खान यांच्या मते, त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी सरकार त्यांच्या पत्नीचा एकांतात छळ करत असून ही वागणूक इस्लामविरोधी आहे.

Web Title: Imran khan slams pakistan judges conscience sold bushra bibi jail update 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Imran khan
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Bajaur Attack: पाकिस्तानी लष्कराच्या तळावर आत्मघाती स्फोट; TTPच्या ‘इस्तशहादी’ पथकाचा भीषण हल्ला, 15 जवान ठार
1

Bajaur Attack: पाकिस्तानी लष्कराच्या तळावर आत्मघाती स्फोट; TTPच्या ‘इस्तशहादी’ पथकाचा भीषण हल्ला, 15 जवान ठार

Henley Passport Index: जगातील सर्वशक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर; पाकिस्तानची पुन्हा चेष्टा, भारताच्या क्रमवारीत मोठा फेरबदल
2

Henley Passport Index: जगातील सर्वशक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर; पाकिस्तानची पुन्हा चेष्टा, भारताच्या क्रमवारीत मोठा फेरबदल

Global Politics : असीम मुनीरचा ‘डबल गेम’! अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसत इराणला मोठी मदत; ट्रम्पही संतापले?
3

Global Politics : असीम मुनीरचा ‘डबल गेम’! अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसत इराणला मोठी मदत; ट्रम्पही संतापले?

Pakistan Bomb Blast : पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू
4

Pakistan Bomb Blast : पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.