India-Afghanistan Relations Afghanistan Parliament's statement on India-Pakistan tensions
काबूल: भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरु झाला होता. दरम्यान १० मे रोजी दोन्ही देशाच्या डीजीएमोने चर्चा केली आणि युद्धविरामावर सहमती दर्शवली. याच वेळी अफगाणिस्तानच्या संसदेतून प्रतिक्रिया समोर आली आहे.
अफगाणिस्तानच्या संसद सदस्य मरियम सोलोमानखिल यांचे मोठे विधान समोर आले आहे. एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर भाष्य केले आहे. त्यांनी भारताला साथ दिली असून पाकिस्तानवर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी भारताला अफगाणिस्तानचा खरा मित्र म्हणून संबोधले आहे. तसेच मरियम यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूर चे कौतुक केले आहे.
मरियम यांनी म्हटले की, “भारताने जे केले ते आवश्यक आहे. तसेच भारत अफगाणिस्तानचा खरा मित्र आहे. पाकिस्तान आणि भारताचे युद्ध झाले तेव्हा आम्ही भारतासोबत होतो. आमची जनता नेहमीच भारतासोबत उभी राहिली आहे. तसेच आम्हाला माहिती आहे कोण खरे आणि खोटे, आम्ही पाकिस्तानसोबत कधीच नव्हतो.
#WATCH | California, USA: Member of Afghanistan’s Parliament in Exile, Mariam Solaimankhil says, “… What India did was necessary. Pakistan is breeding terrorism in Kashmir. They took innocent lives, and you can’t let them go. The attacks that India is doing are in a very… pic.twitter.com/8SYCcbkpIX
— ANI (@ANI) May 14, 2025
तसेच मरियम यांनी भारताने संकटाच्या काळात अफगाणिलस्तानला केलेल्या मदतीबद्दल देखील आभार मानले आहेत. संघर्षाच्या काळात भारताने आम्हाला साथ दिली. तसेच अफगाणिस्तानची जनता देखील भारतासोबत उभी पाहिली. भारत हा अफगाणिस्तानचा खरा मित्र आहे.
तसेच भारताने पाकिस्तानविरोधात केलेली कारवाई ही आवश्यक होती. त्या म्हणाल्या की, “भारताने जे केले ते योग्यच आहे. पाकिस्तान दहशतवादाला नेहमीच प्रोत्साहन देत राहिला आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसून निष्पाप नागरिकांना मारले आहे. यामुळे त्यांना धडा शिकवला पाहिजे. भारताने दहशतवाद्यांच्या छावण्या आणि अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.”
मरियम या निर्वासित अफगाणिस्तान संसदेच्या सदस्या आहेत. त्या तालिबानच्या कट्टर विरोधक आहेत. त्यांनी कॅलिफोर्नियाच्या स्टेट युनिव्हर्सिटी लॉस एंजेलिसमधून मीडियाचे शिक्षण घेतले आहे.