Trump administration offers money to unaccompained migrants teenagers to leave US
US Immigration : वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळापासून अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. WHO मधून बाहेर पाडण्याच्या निर्णयापासून ते बेकायदेशीर स्थलांतरविरोधी (Illegal Immigration) ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी विशेष करुन देशातून परदेशी आणि बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढण्याचे धोरण राबवले आहे.
यावेळी ट्रम्प यांनी या धोरणाचा एक भाग म्हणून मोठी योजना आखली आहे. ट्रम्प प्रशासनाने आता स्थलांतर मुलांना त्यांच्या इच्छेने परत जाण्यासाठी आर्थिक मदत देण्याची ऑफर दिली आहे.
ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
रॉयटर्सने दिलेल्या अहवालानुसार, unaccompained migrants teenagers म्हणजेच पालकांशिवाय, एकटे अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना ट्रम्प प्रशासनाने पैसे ऑफर केले आहेत. जर या मुलांनी त्यांच्या इच्छेने आपल्या मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला तर या मुलांना २ हजार ५०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच रुपयांमध्ये २.२ लाख रुपये दिले जाणार आहेत. ही योजना १४ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी लागू करण्यात आली आहे. पण मेक्सिकोतून आलेल्या मुलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
डिपोर्टमेंट ऑफ होमलॅंड सिक्युरिटी (DHS) आणि ऑफिस ऑफ रिफ्युजी रिसेटलमेंटने यासंबंधी स्थलांतरितांच्या शेल्टर होम्सना एक पत्र पाठवून माहिती दिली आहे. या पत्रात सांगण्यात आले आहे की, न्यायाधीश परवानगी देऊन मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या देशात परतल्यावर २,५०० डॉलर्स दिले जातील. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने मोठ्या लोकांना देशातून स्वच्छेने जाण्यासाठी १००० डॉलर्स दिले होते.
सध्या २१०० हून अधिक मुले पालकांशिवाय अमेरिकेच्या हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस (HHS) विभागाच्या देखरेखेखाली आहेत. २०१९ पासून ६ लाखांहून अधिक मुलांनी अमेरिका-मेक्सिको सीमा पार करुन बेकायदेशीर स्थलांतर केले आहे. सध्या ट्रम्प प्रशासन या स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी जलद गतीने प्रयत्न करत आहे.
परंतु ट्रम्प यांच्या या निर्णयावर अमेरिकेत जोरदार टीका केली जात आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय क्रूर असल्याचे मानवतावादी संस्थेने म्हटले आहे. या मुलांना त्यांच्या सुरक्षितेतची हमी मिळणे आवश्यक आहे. पण ट्रम्प सरकार मुलांना धोकादायक परिस्थिती ढकलत असल्याचे म्हटले आहे. यामुळे मानवी हक्क व सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्रश्न १. ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे देशात घुसलेल्या मुलांच्या हद्दपारासाठी काय निर्णय घेतला आहे?
ट्रम्प यांनी देशात बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना एकटे राहणाऱ्या मुलांना हद्दपार करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न २. ट्रम्प यांनी unaccompained migrants म्हणजे पालकांशिवाय राहणाऱ्यांना किती रक्कम ऑफर केली आहे?
रॉयटर्सने दिलेल्या अहवालानुसार, unaccompained migrants teenagers म्हणजेच पालकांशिवाय, एकटे अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना २,५०० डॉलर्स ऑफर केले आहेत.