रशिया-युक्रेन युद्धबंदीवर आज तुर्कीमध्ये बैठक ; चर्चेसाठी व्लादिमिर पुतिन राहणार उपस्थित (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अंकारा: अखेर गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धबंदीवर चर्चा होणार आहे. आजा तुर्कीमध्ये ही चर्चा होणार आहे. यासाठी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये पोहोचतील. दरम्यान त्यांनी म्हटले आहे की, ते रशियासोबत युद्धबंदीच्या कोणत्याही स्वरुपाच्या विषयावर चर्चा करण्यास तयार आहेत. आता रशिया चर्चेसाठी कोणाला पाठवेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यावर पुढील चर्चा अवलंबून असेल. सध्या रशियाने चर्चेसाठी प्रतिनिधी मंडळाची घोषणा केलेली नाही.
दरम्यान या चर्चेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन उपस्थित राहणार आहेत की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे इस्तंबूलमध्ये युद्धबंदीच्या चर्चेचा प्रस्ताव स्वत:हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मांडला होता.
याच वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी २९ एप्रिल रोजी एकतर्फी युद्धबंदीची घोषण केली होती. ही युद्धबंदी ३ दिवसांसाठी ८ मे ते १० मे पर्यंत लागू करण्यात आली होती. याच वेळी रशियाने युक्रेनने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला चढवून युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा दावा केला.
दरम्यान या चर्चेपूर्वी २४ तांस आधी युक्रेनने रशियाविरोधात मोठी कारवाई केली. युक्रेनने रशियाच्या १२०० हून अधिक सैनिकांना ठार केले. तसेच युक्रेनच्या तोफखाना देखील नष्ट केल्या.
तर याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने देखील युक्रेनच्या तोफखनांचे युनिट नष्ट केले. रशिाने युक्रेनच्या सुमी शहरातील तोफखानांच्या कारखान्यांवर ही कारवाई केली. या युद्धात आतापर्यंत ९ लाख ७० हजार रशियन सैनिक मारले गेले असल्याचे म्हटले जात आहे. परंतु अद्याप रशियाने याची पुष्टी केलेली नाही.
दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वत:हा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर झेलेन्स्कींना युद्धबंदीच्या थेट चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. पुतिन यांनी म्हटले होते की, हा प्रस्ताव युक्रेनच्या अटींवर अवलंबून आहे. आता केवळ युक्रेनला निर्णय घ्यायचा आहे. या चर्चेचा उद्देश कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करणे असल्याचे पुतिन यांनी म्हटले होते.
दरम्यान आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, रशिया-युक्रेनमध्ये इस्तंबूलमध्ये काय चर्चा होईल. या चर्चेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन उपस्थित राहतील का?