Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युनूस सरकार संभ्रमात! शेख हसीनानंतर भारतावर लोकांना ‘गायब’ केल्याचा बांगलादेशचा आरोप

भारत आणि बांगलादेश संबंध सध्या तणावपूर्ण टप्प्यावर आहेत. अलीकडेच बांगलादेशने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारतावर लोकांना गायब केल्याचा आरोप केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 22, 2024 | 11:27 AM
युनूस सरकार संभ्रमात! शेख हसीनानंतर भारतावर लोकांना 'गायब' केल्याचा बांगलादेशचा आरोप

युनूस सरकार संभ्रमात! शेख हसीनानंतर भारतावर लोकांना 'गायब' केल्याचा बांगलादेशचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: भारत आणि बांगलादेश संबंध सध्या तणावपूर्ण टप्प्यावर आहेत. अलीकडेच बांगलादेशने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शेख हसीनासह भारतावर बांगला देशातील काही लोकांना गायब केल्याचा आरोप केला आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंधांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतावर बागंलादेशाचा आरोप

बांगलादेशमधील “जबरदस्तीने गायब होणाऱ्या व्यक्तींच्या” प्रकरणांची चौकशी करणाऱ्या आयोगाने जारी केलेल्या अहवालानुसार, या घटनांमध्ये भारताचा सहभाग असू शकतो. तसेच माजी न्यायाधीश मैनुल इस्लाम चौधरी यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने “अनफोल्डिंग द ट्रुथ” खाली तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, “बांगलादेशातील जबरदस्तीने गायब होण्याच्या घटनांमध्ये भारताची भागीदारी असल्याचे पुरावे सापडले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India-Bangladesh Relations: भारतासमोर बांगलादेशने गुढगे टेकले? जाणून घ्या का केले युनूस सरकारने मदतीचे आवाहन

आयोगाने आपल्या अहवालात आणखी काय म्हटले आहे?

आयोगाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, “भारतीय तुरुंगांमध्ये कैद असलेल्या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवावी. यासाठी बांगलादेशच्या पराराष्ट मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने पुढाकार घ्यावा.” तसेच बांगलादेशाच्या बाहेर या प्रकरणाचा तपास करणए त्यांच्या अधिरापक्षेत्राबाहेर आहे असेही आयोगाने स्पष्ट केले. आयोगाने असेही नमूद केले आहे की, “भारताचा या संपूर्ण प्रकरणात सहभाग आणि त्याचा दोन्ही देशांवर होणारा परिणाम यासाठी अधिक तपशीलवार विश्लेषण आवश्यक आहे.”

शेख हसीना यांच्यावर देखील आरोप

यापूर्वी याच आयोगाने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर देखील अशाच प्रकारचे आरोप केले होते. मात्र, अंतिम अहवालात भारतावर आरोप ठोठवण्यात आला आहे. आयोगाच्या या वेगवेगळ्या निष्कर्षांमुळे बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडले आहेत

पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध बिघडले. अंतरिम सरकारने भारतासोबतचा बँड विथ ट्रान्झिट करार रद्द केला आणि भारतावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पाकिस्तान आणि तुर्कीसारख्या देशांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. खताच्या संकटावर मात करण्यासाठी भारताने बांगलादेशला तातडीने मदत केली होती. मात्र ही मदत केवळ व्यावसायिक लाभापुरतीच मर्यादित आहे.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारताकडून आशा आहेत

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सँड मार्टिन बेट आणि सीमेवरील वाढत्या धोक्याबाबत भारताकडून मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भारताची रणनीती स्पष्ट आहे, गरज पडल्यास बांगलादेशला दबावाखाली आणण्यासाठी योग्य वेळेची वाट पहावी लागेल. बांगलादेशसारख्या शेजारी देशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे शक्य नाही हे भारताला समजले आहे. पण आमचे हित जपण्याला प्राधान्य आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मुस्लिम असूनही तो इस्लामविरोधी आहे…जर्मनीच्या ख्रिसमस मार्केटमध्ये हल्ला करणाऱ्या डॉक्टरबद्दल अनेक खुलासे

Web Title: India bagldesh conflict yunus government commission report saying india involved in enforced disapperence people nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 11:27 AM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • Muhammad Yunus
  • shaikh hasina

संबंधित बातम्या

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
1

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?
3

Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
4

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.