बांगलादेशात राजकीय गोंधळ! ढाका पोलिसांची अवामी लीगच्या फ्लॅश रॅलीवर मोठी कारवाई; २०० हून अधिक नेत्यांना अटक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका महानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कार्यकर्त्यांना मोर्चादरम्यानच अटक करण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशात मोठा गोंधळ सुरु आहे. ढाकाचे डीएमपी आयुक्त एसएम नजरुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या विविध भागात ही कारवाई करण्यात आली आहे. ५०० हून अधिक अवामी लीगच्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांन दिलेल्या माहितीनुसार, या फ्लॅश मोर्चाचा उद्देश देशाच्या निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यस्था बिघडवण्याचा होता.
अवामी लीगचा मोहम्मद युनूस सरकारवर गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या मीज पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या अवामी लीग पक्षाने अंतिरम सरकारवर गंभीर आरोपही केले होते. शेख हसीन यांच्यासह त्यांच्या पक्षातील नेत्यांवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांना तुरुंगात अमानुष वागणूक दिली जात आहे. कार्यकर्त्यांना मानसिक आणि शारीरिक छळ केला जात आहे असे आरोप करण्यात आले होते.
शेख हसीना यांचे वोटर आयडी ब्लॉक
या सर्व घडामोडींदरम्यान युनूस सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांते वोटर आयडी ब्लॉक केले आहे. यामुळे आता त्यांना परदेशातून मतदान करता येणार नाही.
बांगलादेशात राजकीय गोंधळ का उडाला होता?
बांगलादेशात अवामी लीग पक्षाने बांगलादेशची राजधानी ढाकात मोहम्मद युनूस सरकारविरोधात फ्लॅश मोर्चा सुरु केला होता.
बांगलादेशाच्या पोलिसांनी अवामी लीग पक्षाविरोधात काय कारवाई केली?
बांगलादेशात अवामी लीग पक्षाने मोहम्मद युनूस सरकारविरोधात फ्लॅश मोर्चा सुरु केला होता. हा मोर्चा थांबवण्यासाठी ढाका पोलिसांनी मोर्चात सहभागी झालेल्या २०० हून अधिक लोकांना अटक केली होती.
ढाका पोलिसांनी अवामी लीगवर काय आरोप केला?
ढाका पोलिसांनी शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर देशाच्या निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.






