बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा तणाव; अवामी लीगचा युनूस सरकारवर तुरुंगातील त्यांच्या कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शेख हसीना (Sheikh Hasina) अवामी लीगने अंतिरम सरकारवर आरोप केला आहे की, शेख हसीन यांच्यासह त्यांच्या पक्षातील नेत्यांवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांना तुरुंगात अमानुष वागणूक दिली जात आहे. कार्यकर्त्यांना मानसिक आणि शारीरिक छळाला समोरे जावे लागत आहे. यासंर्भात अवामी लीग पक्षाने एक निवेदनही जारी केले आहे.
अवामी लीगने जारी केलेल्या निवदेनात सांगण्यात आले आहे की, सध्याच्या सकारने अवामी लीगच्या नेत्यांना विनाकारण तुरुंगात टाकले आहे. तसेच त्यांच्यावर विशेष करुन महिला नेत्यांना क्रूर आणि अमानुष वागणूक दिली जात आहे. त्यांचा शारीरित अपमान केला जात आहे. जर तुरुंगातील नेत्यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर याबदल्यात त्यांचा अपमान करुन मानसिक छळ केला जात आहे. अवामी लीगच्या मते, अंतरिम सरकारने खोट्या आणि बनावट आरोपांखील त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना अडकवले आहे.
अवामी लीगकडून सरकारच्या या कृत्याला तीव्र निषेध
अवामी लीगने अंतरिम सरकारच्या तुरुंगातील त्यांच्या कार्यकर्त्यांवरील छळाला तीव्र निषेध केला आहे. यामुळे अवामी लीगच्या पक्षाने आंतरराष्ट्रीय समुदाय, मानवाधिकार संघटनांकडे युनूस सरकारविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच देशभरातील तुरुंगातील मृत्यूंच्या स्वतंत्र चौकशीचीही मागणी अवामी लीगकडून केली जात आहे.
शेख हसीना यांचे वोटर आयडी ब्लॉक
या सर्व घडामोडींदरम्यान युनूस सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांते वोटर आयडी ब्लॉक केले आहे. यामुळे आता त्यांना परदेशातून मतदान करता येणार नाही.
अंतिरम सरकारवर अवामी लीगने काय आरोप केला आहे?
शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने युनूस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अवामी लीगने आरोप केला आहे की, त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते विशेष करुन महिलांचा तुरुंगात मानसिक आणि शारीरिक छळ केला जात आहे.
अवामी लीगच्या पक्षाने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे काय मागणी केली?
अवामी लीगच्या पक्षाने आंतरराष्ट्रीय समुदाय, मानवाधिकार संघटनांकडे युनूस सरकारविरोधात कारवाईची आणि देशातील तुरुंगातील मृत्यूंची स्वतंत्र चौकशीचीही मागणी केली आहे.






