
India Bangladesh internet war, bangladesh news
मराठी मध्ये एक म्हण आहे “जो दुसऱ्यांसाठी जाळं विणतो, तो स्वतः त्यात अडकतो.” हेच बांग्लादेशचं आज झालं आहे. भारताला इंटरनेट डिप्लोमसीद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणारा बांग्लादेश, आता भारताच्या डिजिटल धोरणामुळे स्वतःच्याच जाळ्यात अडकला आहे.
बांग्लादेशचे सल्लागार मोहम्मद यूनुस यांनी भारतासोबत इंटरनेट सहकार्यासाठी एक डील केली होती इंटरनेट डिप्लोमसी जे बांग्लादेशने राजकीय डावपेच रचण्यासाठी वापरले ते शेवटी त्यांच्या देशालाच तोटा देऊन गेले. भारताने दिलेल्या प्रत्युत्तराने बांग्लादेशची इंटरनेट अर्थव्यवस्था हादरली आहे. असं म्हणतात कि “ज्याचे त्याचे कर्म जैसे फळ देतो रे ईश्वर”.
काय घडलं नेमकं?
21 ऑक्टोबर 2025 पासून BSNL ने बांग्लादेशकडून येणारा 10 GBPS इंटरनेट बँडविड्थ सप्लाय पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांना (नॉर्थ ईस्ट) आता इंटरनेट थेट भारतीय नेटवर्क आणि सॅटेलाइट सिस्टममधून मिळणार आहे.याचा अर्थ भारत आता कोणत्याही परदेशी रूटवर अवलंबून राहणार नाही. हे एक छोटं पाऊल दिसत असलं तरी त्याचा आर्थिक आणि रणनीतिक प्रभाव प्रचंड आहे.
भारताची डिजिटल आत्मनिर्भरता वाढली
भारताने चेन्नई, मुंबई आणि दीघा येथे नवीन सबमरीन केबल लँडिंग स्टेशन उभारले आहेत.त्यामुळे आता नॉर्थ ईस्टला डेटा फक्त 35 ते 45 मिलीसेकंदात मिळेल (पूर्वी 85-100ms लागत होते).सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्कही वाढवण्यात आली आहे, म्हणजे एका रूटमध्ये बिघाड झाला तरी दुसरा लगेच कार्यरत होईल.भारत आता डिजिटल प्रोड्युसर नेशन बनत आहे. Google, Netflix, YouTube सारख्या कंपन्या भारतात सर्व्हर बसवत आहेत.
अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील चर्चा फोल! ‘या’ मुद्द्यांवर तयार नाही तालिबान; चीनचा वाढला ताण
भारताच्या निर्णयाचा व्यापक परिणाम:– भारताचा इंटरनेट नेटवर्क पूर्णपणे सुरक्षित आणि भारतीय नियंत्रणात आला आहे.बांग्लादेशकडून दबाव आणण्याची शक्यता आता संपली आहे त्यामुळे बांग्लादेशच्या डिजिटल हब बनण्याच्या स्वप्नावर आता पाणी फिरले आहे.भारताने या घटनेला डिजिटल आत्मनिर्भरतेच्या मोठ्या यशात बदलले आहे.
भारताशी मैत्री ही…’ मार्को रुबियोचे स्पष्ट विधान
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1. भारताने बांग्लादेशकडून इंटरनेट का बंद केलं?
भारतावर डिजिटल दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याने भारताने आत्मनिर्भरतेचा मार्ग निवडला आणि बांग्लादेशकडून येणारा बँडविड्थ सप्लाय बंद केला.
Q2. बांग्लादेशला याचा किती तोटा झाला?
दरवर्षी 5-10 मिलियन डॉलरची कमाई थांबली आणि त्यांचा डिजिटल मार्केट अडचणीत आला आहे.
Q3. भारताला याचा फायदा काय झाला?
भारत आता पूर्णपणे स्वतःच्या नेटवर्कवर अवलंबून आहे. नॉर्थ ईस्ट भागात इंटरनेट स्पीड दुपटीने वाढला आहे आणि नेटवर्क सुरक्षाही अधिक मजबूत झाली आहे.
Q4. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये काय बदल झाले?
चेन्नई, दीघा आणि मुंबई येथे नवीन सबमरीन लँडिंग स्टेशन कार्यान्वित झाली असून सॅटेलाइट नेटवर्कचा वापर वाढला आहे.