Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर UN वरील विश्वास उडेल; UNSC मध्ये सुधारणांवर भारताचा पुन्हा जोर; संयुक्त राष्ट्रांना गंभीर इशारा

India on UNSC Reform : भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषेदते २०२८-२९ च्या कालवधीत स्थायी सदस्यत्वासाठी मोहिम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत विकसनशील देशांच्या सहभागाची मागणी केली आहे. सतेच संयुक्त राष्ट्रांनाही स्पष्ट इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 03:45 PM
India Demand Reform in UNSC

India Demand Reform in UNSC

Follow Us
Follow Us:
  • संयुक्त राष्ट्र परिषदत अपयशी ठरली?
  • UNSC मध्ये सुधारणांवर भारताचा पुन्हा जोर
  • संयुक्त राष्ट्रांना गंभीर इशारा
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)आपली जागा मजबूत करण्यासाठी भारताने पुन्हा कंबर कसली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी २०२८-२९ साठी सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व आणि व्हिटो पॉवर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या दरम्यान भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत व्यापाक सुधारणांची मागणी केली आहे. तसेच भारताने सुधारणा न झाल्यास यूएनवरील विश्वास कमी होत असल्याचे म्हटले.

UNSC मध्ये भारताच्या दावेदारीवर चीनची भारताला साथ? पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका

काय म्हणाला भारत?

सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्यात आलेल्या अपयशामुळे संयुक्त राष्ट्रांविषयीचा जनमत खालावत असल्याचा भारताने गंभीर इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद संघर्ष सोडवण्यात आणि मानवी दुःख कमी करण्यात अपयशी ठरली आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, पी. हरीश म्हणाले की, जगभरातील संघर्षांमध्ये प्रभावीपणे हस्तक्षेप करण्यास सुरक्षा परिषदेच्या असमर्थतेमुळे अलिकडच्या काळात संयुक्त राष्ट्रांविषयीची जनमत खालावली आहे.

भारतीय प्रतिनिधी म्हणाले की, सुरक्षा परिषद बाधित लोकांचे दुःख कमी करण्यात निष्प्रभ ठरली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याच्या आपल्या मूलभूत तत्त्वाचे पालन करण्याच्या तिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पी. हरीश हे २०२४ च्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेतील ‘डील फॉर द फ्युचर’च्या उद्दिष्टांपैकी एक असलेल्या ‘मेकिंग मल्टीलॅटरलिझम फिट फॉर द फ्युचर’ या विषयावरील मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत बोलत होते.

UNSC त सुधारणेची भारताची पुन्हा मागणी

पी. हरीश यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली ८० वर्षे जुनी संयुक्त राष्ट्रांची रचना आजच्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अपुरी आहे. एक गट म्हणून, संयुक्त राष्ट्रांनी सुरक्षा परिषदेच्या सुधारणेच्या दिशेने कोणतीही लक्षणीय प्रगती केलेली नाही. त्यांनी खंत व्यक्त केली की, परिषदेच्या सुधारणेसाठीच्या आंतर-सरकारी वाटाघाटी तयार निवेदनांच्या कधीही न संपणाऱ्या चक्रातच मर्यादित राहिल्या आहेत.

याव्यतिरिक्त, भारतीय राजदूतांनी जागतिक संघर्षांमध्ये प्रभावीपणे हस्तक्षेप करण्यात सुरक्षा परिषदेच्या अपयशावर तीव्र टीका केली. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधींनी म्हटले आहे की, युद्ध रोखण्यात आणि मानवी दुःख कमी करण्यात सुरक्षा परिषदेच्या अपयशामुळे संयुक्त राष्ट्रांवरील जनतेचा विश्वास कमी झाला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ऐतिहासिक युरोप दौरा; मोल्डोव्हा आणि उत्तर मॅसेडोनियाला पहिल्यांदाच देणार भेट

Web Title: India demands unsc reform warns un losing global trust

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
1

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम
2

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी
3

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी

Israel-Hamas War: हमासला सर्वात मोठा झटका; उत्तर गाझातून लष्करी कमांडर अल-अरबीदला इस्रायली सैन्याने उचलले
4

Israel-Hamas War: हमासला सर्वात मोठा झटका; उत्तर गाझातून लष्करी कमांडर अल-अरबीदला इस्रायली सैन्याने उचलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.