Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ऐतिहासिक युरोप दौरा; मोल्डोव्हा आणि उत्तर मॅसेडोनियाला पहिल्यांदाच देणार भेट

President Murmu Europe Visit : राष्ट्रपती मुर्मू तीन युरोपीय देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. याचा उद्देश भारत-युरोपीय द्विपक्षीय संबंध बळकट करणे आणि युरोपशी आर्थिक सहकार्य अधिक दृढ करणे आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 03:02 PM
President Murmu Europe Visit

President Murmu Europe Visit

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ऐतिहासिक युरोप दौरा
  • मोल्डोव्हा आणि उत्तर मॅसेडोनियाला पहिल्यांदाच देणार भेट
  • जाणून घ्या काय आहे दौऱ्याचा उद्देश?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १९ ते २५ जुलै २०२६ च्या कालावधीत युरोप देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या मोल्डोव्हा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाला भेट देणार आहे. मोल्डोव्हाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्या निमंत्रमावरुन हा दौरा होत आहे. भारतीय राष्ट्रपतींची मोल्डोव्हाला ही पहिली भेट ठरेल.

US-Iran War : सहाव्या दिवशीही संघर्ष थांबेना! अमेरिकी हल्ल्यांना इराणचा पुन्हा जोरदार पलटवार; बहरीन-कुवैतमध्ये वाजले सायरन

मोल्डोव्हात व्यापार परिषदेत होणार सहभागी

या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोल्डोव्हाच्या राष्ट्रपती माया सांडू यांची भेट घेतील. यावेळी दोन्ही नेते आणि शिष्टमंडळात स्तरावरील चर्चा होईल. तसेच मोल्डोव्हाच्या प्रजासत्ताक संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रोसू यांचीही त्या भेट घेणार आहे.

राष्ट्रपती मोल्डोव्हा-भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. तसेच व्यापार परिषदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय तेथील भारतीय समुदायाची देखील मुर्मू भेट घेणार आहेत.

भारत आणि मोल्डोव्हा संबंधांना नवी दिशा

भारत आणि मोल्डोव्हातील संबंध सौहर्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण आहे. या भेटीमुळे या संबंधांना एक नवी दिशा मिळाले. या दौऱ्यात कृषी, आरोग्यसेवा, आणि फार्मास्युटिकल्स, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशात सहकार्यावर चर्चा होईल.

उत्तर मॅसेडोनिया

याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनियालाही भेट देणार आहे. २१ ते २२ जुलै दरम्यान ही भेट होणार असून राष्ट्रपती गोर्डाना सिलजानोव्स्का-दाव्हकोव्हा यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होत आहे. भारतीय राष्ट्रपतींची उत्तर मॅसेडोनियालाही पहिलीच भेट असणार आहे.

यावेळी राष्ट्रपती मुर्मू मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिलजानोव्स्का-दाव्हकोव्हा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच मॅसेडोनियाचे पंतप्रधान ख्रिस्टिजन मिकोस्की आणि संसदेचे अध्यक्षांचाही भेट घेणार आहे. तसेच उत्तर मॅसेडोनियातही व्यापार परिषदेला संबोधित करतील.

या दौऱ्यातही कृषी, औषधनिर्माण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा होईल. यासाठी उत्तर मॅसेडोनियाने देखील विशेष रस दाखवला आहे.

रोमानियाला तीन दशकांंनतर भेट

तसेच रोमानियाचे राष्ट्राध्यत्र निकुशोर दान यांच्या निमंत्रणावरुन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २३ ते २५ जुलै २०२६ या कालवधीत भेट देणार आहेत. तीन दशकानंतर भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिलाच दौरा आहे.

यावेळी मुर्मू रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निकुशोर दान, हंगामी पंतप्रधान इली बोलोझान, सिनेटचे अध्यक्ष मिर्सेआ अब्रुडियन आणि ‘चेंबर ऑफ डेप्युटीज’चे अध्यक्ष सोरिन ग्रिंडियानू यांची भेट घेतील. तसेच रोमानिया-भारत संसदीय मैत्री संघाच्या सदस्यांचीही त्या भेट घेणार आहेत.

या दौऱ्यात भारत-रोमानियामधील आर्थिक भागीदारी मजूबत करण्यावर भर देण्यात येईल. तसेच युरोपियन युनियन आणि भारतामधील मुक्त व्यापार कराराची भागीदारी देखील बळकट होईल.

राष्ट्रपती मुर्मू यांचा तीन देशांचा हा अधिकृत दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भारताचे युरोपशी संबंध अधिक बळकट होतील.

UNSC मध्ये भारताच्या दावेदारीवर चीनची भारताला साथ? पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका

Web Title: President droupadi murmu europe visit moldova north macedonia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Droupadi Murmu
  • World news

संबंधित बातम्या

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
1

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
2

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा
3

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?
4

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.