Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Politics: बांगलादेशचा शेख हसीनाविरोधात डाव फसला; भारत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतातच आश्रय घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवली असून त्या ऑगस्ट 2023 पासून भारतात राहात आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2025 | 11:08 AM
Bangladesh Politics: बांगलादेशचा शेख हसीनाविरोधात डाव फसला; भारत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:

ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतातच आश्रय घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवली असून त्या ऑगस्ट 2023 पासून भारतात राहात आहेत. शेख हसीना यांनी बांगलादेशातील देशव्यापी आंदोलनांवेळी त्यांनी बांगलादेश सोडले होते. त्यानंतर त्यांनी भारतात दिल्लीतील सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशने त्यांच्या प्रत्यार्पणाची भारकातकडे मागणी केली होती.

मात्र, भारताने नुकतेच त्यांचा व्हिसा वाढवला आहे, यामुळे त्यांचा भारतातील निवास सोयीस्कर राहील. परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या परवानगीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, त्यांनी हसीनांना अधिकृत आश्रय दिलेला नाही, कारण भारतात शरणार्थींसाठी कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही.

जागतिक घडामोडी संंबंधित बातम्या- कॅनडाच्या सार्वभौमत्वावर ट्रम्प यांचा दावा; कॅनडियन नेत्यांचा तीव्र निषेध म्हणाले… ‘हे आम्हाला मान्य नाही’

बांगलादेशची मागणी आणि शेख हसीनांचा पासपोर्ट रद्द

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने 23 डिसेंबर 2023 रोजी भारत सरकारला पत्र पाठवून शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. या पत्रामध्ये त्यांच्या विरोधात काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बांगलादेशने त्यांचा पासपोर्ट रद्द केला असून, त्यांच्यासह 97 लोकांचे पासपोर्ट देखील रद्द करण्यात आले आहेत. या व्यक्तींवर जुलै 2023 मधील आंदोलनांदरम्यान हत्यांमध्ये सहभागाचा आरोप आहे. 6 जानेवारी रोजी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने हसीनांच्या अटकेचा वॉरंट जारी केला आहे. त्यांना फेब्रुवारी 2024 पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शेख हसीनांच्या चौकशीसाठी भारतात येणार आयोग

बांगलादेशच्या राष्ट्रीय स्वतंत्र चौकशी आयोगाने 2009 मधील बांगलादेश रायफल्सच्या बंडामध्ये झालेल्या 74 जणांच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी भारतात येण्याची योजना आखली आहे. मात्र, भारत सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच, शेख हसीनांच्या मुलाने, साजीब वाजेद जॉय यांनी, त्यांच्या आईने भारतात आश्रय मागितल्याच्या अफवा फेटाळल्या आहेत. तसेच, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हसीनांचे भविष्य त्यांच्या इच्छेनुसार ठरेल.

सध्या भारताने या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. बांगलादेश आणि भारतातील हा तणाव दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा विषय ठरला आहे. शेख हसीनांच्या परताव्याबाबत पुढील निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जगाच्या इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध महामारी; 14 व्या शतकात तीन खंडांमध्ये झाला होता विध्वंस

Web Title: India extends sheikh hasina visa amid extradition call by dhaka nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • shaikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
2

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
3

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
4

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.