India France Defence Deal India Signs Mega Deal for Rafael M Jests From France
नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्समध्ये एक मोठ्या कराराला मान्यता देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने फ्रानसकडून 26 राफेल सागरी विमानांच्या खरेदी कराराला मंजुरी दिली आहे. या कराराची किंमत 63 कोटींपेक्षा जास्त असून लवकरच करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. भारत आणि फ्रान्स संबंधांसाठी एक महत्वाचे धोरणात्क पाऊल मानले जात आहे.
या करारांतर्गत भारतीय नौदलाला 22 सिंगल-सीटर आणि 4 ट्विन-सीटर राफेल सागरी विमान मिळणार आहे. ही विमाने INS विक्रांत विमानवाहू जहाजांवर तैनात केली जाणार आहेत. सध्या भारताचे संरक्षण मंत्रालय फ्रेंच सरकारसोबत अंतिम कराराची चर्चा करत आहे. यावर लवकरच अंतिम करारावर स्वाक्षरी करण्यात येईल.
अंतिम करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सुमारे पाच वर्षांनंतर या राफेल -M लढाऊ विमानांची डिलिव्हरी सुरु होण्याची अपेक्षा आहे. 2029 च्या अखेरपर्यंत ही लढाऊ विमाने भारताला मिळण्यास सुरुवात होईल आणि 2031 पर्यंत सर्वं डिलिव्हरी पूर्ण होईल. राफेल-M विमाने नौदलाच्या INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य विमानवाहू जहाजांवर तैनात करण्यात येणार आहे. सध्या INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य जुन्या MIG-19 लढाऊ विमानंच्या मदतीने कार्यरत आहेत.
INS विक्रांतवर तैनात होणार राफेल-M
फ्रान्सकडून खरेदी केलेली लढाऊ विमाने भारताच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौैका INS तैनात केली जातील. तसेच नैदलाच्या विद्यामान MIG-29K लढाऊ विमानांसोबत काम करती. यामुळे भारतीय वायुदल आणि नेव्ही दलाच्या ताकदीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.सध्या भारतीय हवाई दल (IAF) अंबाला आणि हशिमारा हवाई तळांवरुन 36 राफेल जेट विमाने संचलन करत आहेत.
नवीन राफेल-M जेट्स विमाननवाहू जहाजांवरुन उड्डाण आणि उतरण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ही नवीन लढाऊ विमाने मजबूत लॅंडिग गियर, अरेस्टर हुक आणि STOBAR तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ही लढाऊ विमाने कमी अंतरावरुन उड्डण करु शकतात आणि लवकर लॅंडिग करु शकतात. यामुळे भारतीय नौदलाची ताकद लक्षणीरीत्या वाढणार आहे.
या लढाऊ विमानाची AESA रडार (Active Electronically Scanned Array) शत्रूवर जलद आणि अचूकपणे हल्ला करते. तसेच या विमानांची इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली विमानाला लपण्यास, स्वत:चे संरक्षण करण्यास मदत करते. या विमानांचा जास्तीत जास्त वेग 1.8 इतका असून ध्वनीच्या वेगाच्या दुप्पटीने हे उड्डाण करते. राफेल -M ची लढाऊ क्षमता ही 1 हजार 850 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या लढाऊ राफेलमुळे लांब पल्ल्यांच्या लक्ष्यावर निशाणा साधता येतो. शिवाया या विमानात हवेत इंधन भरण्याची देखील क्षमत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या अनेत महिन्यांपासून भारत आणि फ्रान्समध्ये सागरी राफेलच्या विमानांची खरेदीची चर्चा सुरु होती. 2016 मध्ये हवाई दलासाठी राफेल खरेदी करण्याची भारताची इच्छा होती, परंतु काही कारणास्तव ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही.
दरम्यान 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी फ्रान्स दौऱ्यादरम्यान या कराराची चर्चा केली. त्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सला विनंती पंत्र पाठवले आणि 2023 मध्ये फ्रान्सने ते स्वीकरले. यापूर्वी सप्टेंबर 2016मध्ये भारताने फ्रान्सकडून हवाई दलासाठी 59 हजार कोटी रुपयांची 36 लढाऊ राफेल विमाने खरेदी केली होती.