Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan Conflict : भारताने UNSC पाकिस्तानची बोलती केली बंद; दहशतवादावर भर सभेत सर्जिकल स्ट्राईक

India Pakistan Tension : UNSC त भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानची बोलती बंद केली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी प्रपोगंडाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलावीत असे भारताने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 27, 2026 | 01:29 PM
UNSC

UNSC

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानची पुन्हा बोलती बंद
  • UNSC मध्ये दहशतवादावर भारताने सुनावले खडे बोल
  • जाणून घ्या काय म्हटले?
India on Pakistan in UNSC : नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र शिखर परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला (Pakistan) खडे बोल सुनावले आहे.  भारताने दहशतवाद आणि  दुहेरी भूमिकेवर पाकिस्तानच्या धोरणावर कठोर टीका केली आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानवर दहशतवाद्यांना समर्थन करणे, खोटा प्रपोगंडा पसरवणे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पुराव्यांसह स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानचा केवळ भारताला आणि भारतीय नागरिकांना नुकसान पोहोचवण्याचा हेतू आहे.

‘आम्ही भारताचा नकाशा बदलू…’ ; पाकिस्तानची पुन्हा युद्धाची धमकी; दहशतवाद्यांसह असीम मुनीरचा नवा डर्टी प्लॅन उघड

गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानच्या प्रतनिधींनी भारताच्या पाकिस्तानवरील लष्करी कारवाईवर द्वेषपूर्ण विधाने केली होती. भारताने ही विधाने खोटे आणि स्वार्थी असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताने पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत या हल्ल्यात २६ निरापराध लोकांचा बळी घेतला असल्याचे सांगितले. हा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी देण्यामुळे झाला असल्याचे सांगितले.

आत्मपरिक्षणाचा सल्ला

UNSC मध्ये बोलताना पी. हरीश यांनी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवर भाष्य करत देशाच्या संविधानात २७ व्या घटनादुरुस्तीद्वारे लष्कराला संरक्षण दिले असल्याचे म्हटले. ही कृती पाकिस्तानच्या लोकशाही व्यवस्थेला धोका पोहोचवणारी असल्याचे पी. हरीश यांनी ठासून सांगितले.

दहशतवादविरोधी पावले उचलण्याचा सल्ला

याच वेळी पी. हरीश यांनी पाकिस्तानला दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिली. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात आणि दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलत नाही तोपर्यंत पाकिस्तानच्या धोरणांवर आणि दाव्यांवर विश्वास ठेवू नये. भारताने हेही स्पष्ट केले की, दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करणे योग्य नाही. भारताच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्याचे स्पष्ट केले.  याशिवाय पी. हरीश यांनी भारत नेहमीच पाकिस्तानच्या दहशतवादी आणि धोकादायक भूमिकेविरोधात कारवाई करत राहिले असे स्पष्ट केले.

India advises Pakistan to introspect about the rule of law at UNSC. Raises questions on the 27th amendment under which the Pakistani military engineered a “constitutional coup”. Statement by @IndiaUNNewYork @AmbHarishP pic.twitter.com/R7HjdGX2le — Sidhant Sibal (@sidhant) January 27, 2026


पाकिस्तानची बोलती बंद! UNSC च्या बैठकीत हल्ल्याबाबत एकाही प्रश्नाचे देता आले नाही उत्तर

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने UNSC मध्ये पाकिस्तानवर कोणते आरोप केले?

    Ans: भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानवर दहशतवाद्यांना समर्थन करणे, खोटा प्रपोगंडा पसरवणे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

  • Que: भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला कोणते आवाहन केले आहे?

    Ans: भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्या धोरणावर आणि दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

  • Que: भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत दहशतवादावर काय भूमिका घेतली?

    Ans: भारताने दहशतवादाला अवैध ठरवले असून याविरोधात आपल्या नागरिकांचे रक्षण करत राहिल असे म्हटले आहे.

Web Title: India pakistan conflict unsc pahalgam terror attack operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • pahalgam attack
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Middle East War : अमेरिकेची हल्ल्याची जंगी तयारी! महाकाय घातक जहाज हिंद समुद्रात दाखल; इराणही प्रत्युत्तर देण्यास सज्ज
1

Middle East War : अमेरिकेची हल्ल्याची जंगी तयारी! महाकाय घातक जहाज हिंद समुद्रात दाखल; इराणही प्रत्युत्तर देण्यास सज्ज

US-EU Tension : अमेरिकेशिवाय तुमची लायकी काय? भारत-ईयू Mother of Deals मुळे ट्रम्पचा जळफळाट ; युरोपला गंभीर इशारा
2

US-EU Tension : अमेरिकेशिवाय तुमची लायकी काय? भारत-ईयू Mother of Deals मुळे ट्रम्पचा जळफळाट ; युरोपला गंभीर इशारा

अमेरिकेत हिमवादळाचा कहर! भीषण थंडीत २५ जणांचा मृत्यू, वीजपुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती बिकट
3

अमेरिकेत हिमवादळाचा कहर! भीषण थंडीत २५ जणांचा मृत्यू, वीजपुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती बिकट

Iran Regime Change : इराणमध्ये पुन्हा राजेशाहीचे संकेत! माजी महाराणी फराह पहलवी मैदानात; खामेनेईच्या सत्तेला थेट इशारा
4

Iran Regime Change : इराणमध्ये पुन्हा राजेशाहीचे संकेत! माजी महाराणी फराह पहलवी मैदानात; खामेनेईच्या सत्तेला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.