
H-1B Visa
H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय
ट्रम्प प्रशासनाने यापूर्वी एच-१बी व्हिसा नियम अत्यंत कडक केले होते. तसेच व्हिसा शुल्कातही लक्षणीय वाढ केली होती. तसेच व्हिसासाठी सोशल मीडिया तपासणी अनिवार्य केली होती. आता अर्जदारांना आणखी नवीन अर्जदारांना आणखी नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. यंदा २०२६ मध्ये नवीन अर्जदारांच्या व्हिसा मुलाखती घेतल्या जाणार नसल्याचे अमेरिकेच्या भारतातील दूतावासांनी माहिती दिली आहे. भारतातील अमेरिकन दूतावासांनी व्हिसा-स्टॅम्पिंग मुलाखती तारखा पुढे २०२७ पर्यंत ढकलल्या असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये कॉन्सुलर कार्यलयांमध्ये मुलाखतींचे स्लॉट उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या डिसेंबर २०२५ मध्ये अमेरिकेत काम करणाऱ्या कामगारांना आणि नव्या अर्जदारांना अचानकपणे २०२६ मध्ये मुलाखती घेतल्या जाणार असल्याचा मेल आला होता. परंतु आता परिस्थिती अधिक वाईट झाली आहे. यामुळे अर्जदार पुन्हा अमेरिकेत कामासाठी कधी परतू शकतील यामध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.
अमेरिकेन दूतावासांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम अधिक कडक केले आहे. मुलाखतीच्या अपॉइंटमेंट २०२७ पर्यंत पाठवण्यात आल्या आहेत. सर्व अर्जदारांना जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत मुलाखतीसाठी अधिकृत ईमेल पाठवला जाईल असे सांगण्यात आले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या नव्या कडक धोरणांमुळे व्हिसा प्रक्रिया अत्यंत मंद झाली असल्याने तारखा पुढे ढकलण्यात आले असल्याचे तज्त्रांनी म्हटले आहे.
सतत मुलाखतीच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने भारतीय कामगारांसाठी आणि व्यावसायिकांची हा मार्ग बंद होत असल्याचे म्हटले आहे. यामुळे भारतीय आता अमेरिकेसाठी पर्यायी मार्ग शोधू लागले आहेत. सततच्या बदलेल्या तारखांमुळे भारतीयांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद होणार का? असा प्रश्न पडत आहे.
ट्रम्पने भारतीयांचे अमेरिकन स्वप्न चिरडलं; एच-१बी व्हिसा लॉटरी सिस्टम केली बंद
Ans: ट्रम्प प्रशासनाच्या व्हिसा प्रणालीतल कडक नियम आणि अटींमुळे नवीन व्हिसा प्रणालींच्या तपासणी गती मंदावली आहे. यामुळे अमेरिकेने व्हिसा इंटरव्ह्यू २०२७ पर्यंत पुढे ढकलेले आहेत.
Ans: अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीया कमागारांच्या कामावर परतण्याचा बाबतीत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे भारतीयांना पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत.