Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Defense Deals: ‘आम्ही शस्त्रेही देऊ आणि तंत्रज्ञानही!’ जर्मनीच्या पंतप्रधानांनी भारताला दिली जागतिक बाजारपेठ हादरवणारी महाऑफर

India Germany Defence Ties: भारत आणि जर्मनीमधील संरक्षण संबंध अधिक मजबूत होत आहेत. जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ यांच्या भेटीनंतर, 8 अब्ज डॉलर्सच्या एआयपी पाणबुडीवर लवकरच एक मोठा करार होऊ शकतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 16, 2026 | 02:47 PM
india germany 8 billion dollar submarine deal friedrich merz visit 2026

india germany 8 billion dollar submarine deal friedrich merz visit 2026

Follow Us
Follow Us:
  • पाणबुड्यांचा महाकरार
  • जर्मनीचा पवित्रा बदलला
  • चीन-पाकिस्तानला शह

Project 75I German Type 214 NG AIP submarine : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि जर्मन चांसलर फ्रेडरिक मेर्झ यांच्या भेटीनंतर भारत आणि जर्मनीमधील (Germany) संबंधांनी एक ऐतिहासिक वळण घेतले आहे. गेल्या २५ वर्षांतील सर्वात मोठ्या संरक्षण कराराकडे या दोन्ही देशांची पावले पडत आहेत. भारताने आपल्या ‘प्रोजेक्ट ७५-आय’ (Project 75I) अंतर्गत जर्मनीकडून ६ अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याचा निर्णय जवळजवळ अंतिम केला आहे. या एका कराराने जागतिक संरक्षण बाजारपेठेत जर्मनीचा दबदबा वाढला असून, भारत आता रशियावरील आपले अवलंबित्व कमी करून जर्मनीकडे एक ‘भक्कम पर्याय’ म्हणून पाहत आहे.

एकेकाळचा विरोध आणि आताचा स्नेह

एक काळ असा होता जेव्हा जर्मनीच्या माजी चांसलर अँजेला मर्केल यांच्या सरकारने भारताला साधी ‘एमपी५’ (MP5) सबमशीन गन देण्यासही नकार दिला होता. मानवी हक्कांचे कारण देत जर्मनीने भारतावर शस्त्रबंदी लादली होती. मात्र, चांसलर फ्रेडरिक मेर्झ यांनी हा अडथळा पार करत भारताला आपला सर्वात विश्वासार्ह मित्र मानले आहे. मेर्झ यांनी स्पष्ट केले आहे की, जर्मनी आता केवळ शस्त्रे विकणार नाही, तर भारताला तंत्रज्ञान हस्तांतरित (Technology Transfer) करून ‘मेक इन इंडिया’ला गती देईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Poseidon Drone: पुतिनकडे आहे पाण्याखालील प्रलयकाळाचा अग्रदूत; जो कुठेही आणू शकतो 500 फूट उंचीची त्सुनामी, वाचा खासियत

काय आहे ‘टाइप-२१४ एनजी’ पाणबुड्यांची ताकद?

जर्मनीकडून मिळणाऱ्या या पाणबुड्या एआयपी (AIP – Air Independent Propulsion) तंत्रज्ञानाने सज्ज असतील.

  • पाण्याखालील क्षमता: या पाणबुड्या सलग २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली राहू शकतात, ज्यामुळे शत्रूला त्यांचा शोध घेणे अशक्य होते.
  • शस्त्रास्त्रे: यातून प्रगत टॉरपेडो आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात.
  • स्टेल्थ फिचर्स: या पाणबुड्या अत्यंत शांत असून, समुद्राच्या तळाशी राहून शत्रूच्या जहाजांचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहेत.

 

–#India & #Germany to finalize largest military contract to date
-The $8 Bn 6 P75(I) submarine joint production deal is likely to be concluded during the upcoming visit of German Chancellor Friedrich Merz to India on 12 & 13 Jan pic.twitter.com/4YYsUqam9q
— Insightful Geopolitics (@InsightGL) January 8, 2026

credit – social media and Twitter

रशियाची जागा जर्मनी घेणार का?

दशकानुदशके भारत आपल्या शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबून आहे. मात्र, युक्रेन युद्धामुळे रशियाकडून मिळणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा वेळी जर्मनीने भारताला दिलेली ८ अब्ज डॉलर्सची ही ऑफर भारतासाठी एक मोठा आधार ठरली आहे. लष्करी विश्लेषकांच्या मते, जर हा करार यशस्वी झाला, तर जर्मनी हा भारताचा ‘पुढचा रशिया’ म्हणजेच सर्वात मोठा संरक्षण भागीदार ठरू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Conflict: ‘थांबा, नका करू हल्ला!’ इराणवरील अमेरिकन हल्ला रोखण्यासाठी रात्रभर या देशांमध्ये चाललं ‘राजनैतिक युद्ध’

चीन आणि पाकिस्तानची धास्ती

पाकिस्तानने अलीकडेच चीनकडून ८ ‘हँगोर’ क्लास (Hangor-class) पाणबुड्या घेतल्या आहेत. चीननेही हिंदी महासागरात आपली उपस्थिती वाढवली आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताला प्रगत पाणबुड्यांची गरज होती. माझगाव डॉक (MDL) आणि जर्मनीची थिसनक्रुप या करारामुळे भारताची समुद्रातील शक्ती कित्येक पटीने वाढणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि जर्मनीमध्ये कोणता मोठा करार झाला आहे?

    Ans: भारत आणि जर्मनीमध्ये ६ प्रगत एआयपी पाणबुड्यांच्या खरेदीसाठी सुमारे ८ अब्ज डॉलर्सचा करार अंतिम टप्प्यात आहे.

  • Que: जर्मनीने पूर्वी भारताला शस्त्रे देण्यास का नकार दिला होता?

    Ans: तत्कालीन जर्मन सरकारने भारताचा मानवी हक्कांचा रेकॉर्ड खराब असल्याचे सांगून लहान शस्त्रांच्या पुरवठ्यावर बंदी घातली होती.

  • Que: एआयपी (AIP) तंत्रज्ञान म्हणजे काय?

    Ans: एआयपी तंत्रज्ञानामुळे डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांना बॅटरी चार्ज करण्यासाठी वारंवार समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागत नाही, ज्यामुळे त्या शत्रूच्या नजरेतून वाचतात.

Web Title: India germany 8 billion dollar submarine deal friedrich merz visit 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक
1

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट
2

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा
3

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.