USAID Funding 'India has not received a single penny'; Washington Post on India USAID funds
वॉशिंग्टन: सध्या अमेरिका आणि भारतामध्ये USAID निधीवरुन वाद सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे हा वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारताली निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी अमेरिकेने 21 दशलक्ष डॉलर्स दिले होते. त्यांनी आरोप का होता की, बायडेन प्रशासनान हा निधी भारताच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने दिला.
ट्रम्प यांचा आरोप आणि वॉशिंगटन पोस्टचा अहवाल
दरम्यान वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार हे दावे खोटे असून भारताला कोणत्याही प्रकराची मदत मिळालेली नाही. ट्रम्प यांनी दावा केला होता की, अमेरिकन करदात्यांचा पैसा भारताच्या निवडणुकीवर खर्च केला जात आहे.मात्र, ट्रम्प यांनी आरोपाचा कोणताही पुरावा दिला नाही.
यावर वॉशिंग्टन पोस्टने आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केले की, USAID (युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट) कडे अशा कोणत्याही निधीचा उल्लेख नाही. उलट, 21 दशलक्ष डॉलर्सची मदत भारतासाठी नसून बांगलादेशासाठी होती. या दाव्याने अनेकांचे लक्ष वेधले होते, मात्र हा दावा खोटा असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
जागतिक घडमोडी संबंधित बातम्या- कोण आहेत USAIDच्या वीणा रेड्डी? भारतातील त्यांच्या भूमिकेवर होत आहे गंभीर आरोप
अमेरिकन आणि भारतीय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
USAIDच्या अधिकाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला आश्चर्यचकित करणारा आणि निराधार असल्याचे म्हटले आहे, एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, USAID भारताच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारे सहभागी झालेला नाही. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकन सरकारकडे अशा कोणत्याही निधीचा कोणताही उल्लेख नाही, यामुळे ट्रम्प यांचा दावा पूर्णपण चुकीचा आहे.
भारतीय राजकारणातील प्रभाव
भारतामध्ये हा मुद्दा राजकीय स्वरूपाचा बनला. सध्या भारतामध्ये कॉंग्रेस आणि भाजपमध्ये ट्रम्प यांच्या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. भाजपने काँग्रेसवर परदेशी हस्तक्षेपाचा आरोप केला आहे, तर काँग्रेसने वॉशिंगटन पोस्टच्या अहवालाचा आधार घेत भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेड़ा यांनी म्हटले की, “हा खुलासा भाजप आणि त्यांच्या समर्थकांसाठी मोठा धक्का आहे.”
USAID निधीचा खरा उद्देश
USAIDने स्पष्ट केले की, 21 दशलक्ष डॉलर्सचा निधी भारतासाठी नव्हता, तर तो बांगलादेशसाठी होता. हा निधी निवडणूक प्रक्रियेच्या सुदृढीकरणासाठी दिला जातो, पण कोणत्याही देशाच्या निवडणुकीत थेट हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसतो. भारतानेही स्वत:च्या निवडणुकीतील स्वायत्तता कायम असल्याचे स्पष्ट केले.
वीना रेड्डी यांच्यावरही आरोप
सध्या ट्रम्प यांच्या विधानामुळे माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारताच्या निवडणुकीत कोणाला आणि का जिंकवण्याचा प्रयत्न करत होते? अशा प्रश्नांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमध्ये USAID च्या भारतातील माजी प्रमुख वीणा रेड्डी यांचं नावही समोर आलं आहे.