कोण आहेत USAIDच्या वीणा रेड्डी? भारतातील त्यांच्या भूमिकेवर होत आहे गंभीर आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडया)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताली USAID अंतर्गत मिळणारी फंडिग बंद कली. त्यांनतर त्यांनी आणखी एक धक्कादायक विधान केले. यामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकेच्या “युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट” (USAID) ने भारतात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची उपस्थिती वाढवण्यासाठी 21 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 182 कोटी रुपये) वित्तपुरवठा केला होता.
ट्रम्प यांच्या विधानाममुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अमेरिकेच्या निधीची गरज का पडली? तसेच, या निधीच्या माध्यमातून माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारताच्या निवडणुकीत कोणाला आणि का जिंकवण्याचा प्रयत्न करत होते? अशा प्रश्नांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमध्ये USAID च्या भारतातील माजी प्रमुख वीणा रेड्डी यांचं नावही समोर आलं आहे.
वीणा रेड्डी का चर्चेत आल्या?
भाजप खासदार महेश जेठमलानी यांनी वीणा रेड्डी यांच्यावर USAID च्या निधीबाबत गंभीर आरोप केले आहेत. एलॉन मस्क यांच्या अमेरिकेच्य ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नेंट एफिशिएंसी’ (DOGE) या संस्थेने भारतातील USAID च्या निधीबाबत काही खुलासे केले होते. DOGE च्या माहितीनुसार, USAID ने भारतातील मतदान वाढवण्यासाठी मोठा निधी खर्च केला होता. वीणा रेड्डी यांची 2021 मध्ये USAID च्या भारतीय मिशन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, भारतीय तपास संस्थांनी त्यांना प्रश्न विचारण्याआधीच त्या लोकसभा निवडणुकीनंतर एका महिन्यात, म्हणजेच 17 जुलै 2024 रोजी, अमेरिकेत परत गेल्या.
कोण आहेत वीणा रेड्डी?
सध्या चर्चेच असलेल्या वीणा रेड्डी या मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकन राजनियक आहेत. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला असून, त्या अमेरिकेच्या वरिष्ठ परराष्ट्र सेवेत कार्यरत होत्या. 5 ऑगस्ट 2021 रोजी त्यांची USAID च्या भारतातील कार्यलयात प्रमुख म्हणून निवड झाली. रेड्डी या भारत आणि भूतानमधील USAID च्या मिशन डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला आहेत.
भारतातील वीणा रेड्डी यांचे काम
वीणा रेड्डी यांनी USAID च्या मिशन डायरेक्टर म्हणून भारतात तीन वर्षांच्या कार्यकाळात विविध प्रक्लपांवर काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात भारतीय रेल्वे, उर्जा मंत्रालय, नीति आयोग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रासय, अटल इनोव्हेशन मिशन यांसारख्या संस्थांशी अनेक सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. तसेच, USAID अंतर्गत विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.
रेड्डी यांनी अनेक उच्चस्तरीय सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या सहभागामुळे USAID आणि भारत सरकार यांच्यातील सहकार्य वाढले. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील USAID च्या निधीबाबत झालेल्या वादामुळे त्या आता चर्चेत आल्या आहेत. USAID च्या या निधीमुळे भारतातील निवडणुकीत विदेशी हस्तक्षेप झाल्याचा आरोप होत आहे आणि यामुळे हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे.