Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India LPG Import : भारतावरील ऊर्जा संकट टळणार? अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी १० लाख टन LPG आयात

India LPG Import : एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताने अमेरिकेकडून एलपीजी आयात मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला असून जूनमध्ये त १० लाख टनांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 05:40 PM
India Imports 1 Million Tonnes of LPG from US in June

India Imports 1 Million Tonnes of LPG from US in June

Follow Us
Follow Us:
  • भारतावरील ऊर्जा संकट टळणार?
  • अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी १० लाख टन LPG आयात
  • होर्मुजमधील वाहतूक अडणचींमुळे पुरवठ्यावर परिणाम
India LPG Import : भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने मोठी घडामोड समोर आली आहे. मध्यपूर्वेतील तणाव आणि स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेकडून एलपीजी आयात मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जून २०२६ मध्ये अमेरिकेकडून भारताची एलपीजी आयात १० लाख टनांपेक्षा अधिक होण्याची शक्यता असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक स्तर ठरणार आहे.

भारत दरमहा सुमारे २० लाख टन एलपीजी आयात करतो. यापूर्वी देशाच्या गरजेचा मोठा हिस्सा सौदी अरेबिया, यूएई, कतार यांसारख्या मध्यपूर्वेतील देशांकडून पूर्ण होत होता.

India-Pakistan Dispute : पाकिस्तानची बोलती बंद! UNSC मध्ये काश्मीर मुद्याचा उल्लेख करताचा भारताने दाखवला आरसा

होर्मुजमधील वाहतूक अडणचींमुळे पुरवठ्यावर परिणाम

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढता तणाव तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील वाहतूक अडचणींमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला. एप्रिल २०२६ मध्ये भारताची एलपीजी आयात घटून ६.९६ लाख टनांवर आली होती.

त्यानंतर केंद्र सरकारने तेल कंपन्यांना अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात एलपीजी खरेदी करण्याचे निर्देश दिले. परिणामी मे महिन्यात आयात वाढून ११.५ लाख टनांपर्यंत पोहोचली असून, जूनमध्ये ती ११ ते १२ लाख टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेसोबत व्यापार संतुलन सुधारण्यासाठी

अमेरिकेकडून एलपीजी खरेदी वाढवण्यामागे ऊर्जा सुरक्षेसोबतच भारत-अमेरिका व्यापार संतुलन सुधारण्याचाही उद्देश असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय कंपन्यांनी महाग दरातही स्पॉट मार्केटमधून एलपीजी खरेदी केली, कारण देशातील घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवणे सरकारची प्राथमिकता आहे.

दरम्यान, यूएई, कुवेत, कतार, ओमान, अल्जेरिया आणि नायजेरियाकडूनही एलपीजी पुरवठा सुरू आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील परिस्थिती सामान्य झाल्यास मध्यपूर्वेतील पुरवठा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्या अमेरिकेचा उदय भारताचा प्रमुख एलपीजी पुरवठादार म्हणून होत असून, हा देशाच्या ऊर्जा धोरणातील महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

अमेरिका-भारत व्यापार अंतिम टप्प्यात

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उप-सहाय्यक अधिकारी बेथनी पॉलोस मॉरिसन यांनी भारतसोबतचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला. मंगळवारी (२३ जून) कॅपिटल हिल येथे फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज च्या कार्यक्रमात याची माहिती दिली. त्यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चांगल्या संबंधामुळे करारा गती मिळाली आहे.

US Visa Revocation : अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्याला हाकललं? कोणत्याही कारणाशिवाय F-1 Visa रद्द

Web Title: India imports record 10 lakh tonnes of lpg from us in june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • India-US trade deal
  • LPG
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.