Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत, अमेरिका की जपान…; चीनच्या लष्करातील नव्या आधुनिक शस्त्रांचा धोका सर्वाधिक कोणाला? जाणून घ्या सविस्तर 

चीनने आधुनिक क्षेपणास्त्रे, बॅलेस्टिक मिसाइल्सची वाहने, बॅलेस्टिक मिसाइल्स आणि ड्रोन्सचे प्रदर्शन करण्यात आले. जगातील कोणत्याही हवाई संरक्षण प्रणालीला नष्ट करण्याची ताकद या शस्त्रांमध्ये असल्याचे सांगितले जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 04, 2025 | 11:30 PM
Japan, India and China at risk from China's Latest Missiles And Weapons

Japan, India and China at risk from China's Latest Missiles And Weapons

Follow Us
Close
Follow Us:

China News in Marathi : बीजिंग: नुकतेच ३ सप्टेंबर २०२५ रोजी चीनने भव्य विजय परेडचे आयोजन केले होते. दुसऱ्या महायुद्धातील चीनच्या जपानवरील विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त बीजिंगणमध्ये या परेडचे आयोजन केले होते. या परडेसाठी जगभरातील २५ देशांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. या परेडमध्ये उत्तर कोरियाचे किम जोंग उन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे शी जिनपिंग तिकडी एकत्र आली होती. मात्र या तिकडीने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे.

दरम्यान या परेडमध्ये चीनने आपल्या आधुनिक शस्त्रांचे प्रदर्शने केले. यावेळी दोन अत्याधुनिक लष्करी विमाने अधिकृतपणे ताफ्तात सामीलही करण्यात आली. ही परेड आतापर्यंतची सर्वात मोठी परेड मानली जात आहे. पण सध्या प्रश्न पडला आहे की, याचा सर्वात जास्त धोका कोणत्या देशांना आहे. चीन यातून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी आपण चीनने कोणती शस्त्रे प्रदर्शित केली हे जाणून घेऊ.

‘आम्ही धमक्यांना घाबरत नाही…; विक्ट्री डे परेडमध्ये जागतिक नेत्यांसमोर चीनचे लष्करी ताकदीचे प्रदर्शन

चीनच्या लष्करी ताफ्यात सामील झाली अत्याधुनिक क्षेपणास्त्रे

  • या विक्ट्री परेडमध्ये चीनने आपल्या अनेक अत्याधुनिक शस्त्राचे प्रदर्शन केले. यामध्ये लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली सादर करण्यात आली.
  • यावेळी चीनन प्रथमच DF-61 आणि JL-3 या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन केले.
  • तसेच चीनने यिंगजी श्रेणीतील (Eagle Strike)YJ-15, YJ-17, YJ-19 आणि YJ-20 जहाजविरोधी क्षेपणास्त्रे प्रदर्शित केली. कॅरियर किलर YJ-21 चेही प्रदर्शन करण्यात आले, हे अमेरिकेन विमानावाहून जहजांना क्षणात नष्ट करु शकते.
  • तसेच लांब पल्ल्याची बॅलेस्टिक हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र देखील प्रदर्शित झाले.
  • यामध्ये चीनच्या DF-16 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. यामध्ये अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच ही मिसाइल लांब अंतरावर मारा करण्यास सक्षण आहे.
  • याशिवाय, DF-61,DF-31BJ DF-26D, DF17, JL-3 आणि JL-1 क्षेपणास्त्रांनी देखील जगाचे लक्ष वेधले. ही क्षेपणास्त्रे पाणबूडीतूनही डागता येतात.
  • चीनने डोंगफेंग-१७ (डीएफ-१७) हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र देखील प्रदर्शित केले.

आता आपण नेमका कोणत्या देशांना याचा धोका आहे हे जाणून घेऊयात

अमेरिका

  • सध्या चीनच्या या लष्करी प्रदर्शनाने सर्वाधिक धोका अमेरिकेला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अमेरिका हा चीनचा सर्वात मोठा शत्रू आहे. तैवानच्या मुद्यावरुन अमेरिका आणि चीनमध्ये नेहमी वाद होत असतात. चीन तैवानला आपला भाग मानतो, मात्र तैवानने याला नकार दिला आहे. यामध्ये अमेरिका नेहमीच तैवानच्या बाजून उभा राहिला आहे. यासाठी तैवानला अमेरिकेकडून शस्त्रेही पुरवली जातात.
  • सध्या चीन शस्त्रांच्या प्रदर्शावरुन पाश्चत्य आणि दक्षिण आशियाई देशांना अमेरिकेऐवजी त्यांच्याकडून शस्त्रे खरेदीसाठी आकर्षित आहे.
  • अमेरिकन लष्करी शक्तीला सामना करण्यासाठी ही शस्त्रे डिझाइन करण्यात आली असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. विश्लेषकांच्या मते ही शस्त्रे केवळ अमेरिकेच्या सुरक्षेलाच नव्हे तर पॅसिफिख प्रदेशातील त्यांच्या लष्करी तळांसाठी देखील आव्हानं ठरण्याची शक्यता आहे.
  • या प्रदर्शेनातून चीनला आशियावर वर्चस्व गाजवण्याचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो. शिवाय चीनचे DF-5C बॅलिस्टिक क्षेपणास्त्र खास अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या या प्रदर्शना अप्रतिम म्हटले आहे, मात्र हा रशिया, उत्तर कोरिया आणि चीनचा अमेरिकेविरोधी खेळ असल्याचे म्हटले आहे.

जपान

  • १९३७ मध्ये जपान आणि चीन मध्ये भयंकर युद्ध सुरु झाले होते. हे युद्ध १९४५ पर्यंत चालले. यामध्ये चीनने जपानवर विजय मिळवला होता. जपानने चीनवर ताबा मिळवण्याचा कारणास्तव हे युद्ध सुरु झाली होते, मात्र चीनच्या लष्करी ताकदीपुढे जपान टीकू शकला नाही. तेव्हापासूनच दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु झाला.
  • यामुळे यावेळी जपानने देखील सावध राहण्याची गरज आहे. चीन आणि जपानमधील बेटांवरुन जुन्या वादांमुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेक वेळी चीनचे नौदल आणि तटरक्ष दलाने जपानच्या वादग्रस्त बेटांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे.
  • पंरतु अमेरिकेच्या मदतीने आतापर्यंत चीन पळवून लावण्यात आले आहे. मात्र यावेळी अमेरिकेला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. जपान चीनचे मोठे लक्ष्य असण्याची शक्यता आहे. यामुळे जपानच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे.

भारत 

  • चीनची वाढती लष्करी ताकद ही भारतासाठी देखील धोकादायक ठरु शकते. चीन आणि भारतमध्ये सीमांवरुन अनेक वेळा वाद उफळला आहे.
  • शिवाय चीनने अनेक वेळा भारताचा शत्रू पाकिस्तानला मदतही केली आहे. सध्या दोन्ही देशांतील संबंध सुधारक चालले आहेत पण चीनची नवी लष्करी ताकद भारताच्या हावाई संरक्षण प्रणालीसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
  • चीन हिंद महासागरातही भारताला धोकाय पोहोचवण्याची शक्यता आहे.
  • यापूर्वी २०२० गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये भीषण संघर्ष झाला होता. सध्या हा वाद मिटला गलवान खोऱ्यातून चीनने आपले सैन्य माघारी घेतले आहे.
  • परंतु चीनवर विश्वास ठेवणे धोक्याचेही ठरु शकते असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनची हापरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सने भारतावर कधीही हल्ला करु शकते.

क्षणात नष्ट झालं सगळं! पाकिस्तानाच्या महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

Web Title: India japan and america at risk from chinas latest missiles and weapons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 11:30 PM

Topics:  

  • America
  • China
  • Japan
  • World news

संबंधित बातम्या

भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले…
1

भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले…

क्षणात नष्ट झालं सगळं! पाकिस्तानाच्या महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral
2

क्षणात नष्ट झालं सगळं! पाकिस्तानाच्या महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

सौदी अरेबियाचा भारताला धक्का! ‘या’ मोठ्या तेल उत्पादक कंपनीला कच्चा तेलाचा पुरवठा केला बंद
3

सौदी अरेबियाचा भारताला धक्का! ‘या’ मोठ्या तेल उत्पादक कंपनीला कच्चा तेलाचा पुरवठा केला बंद

Afghanistan Earthquake : पुन्हा एकदा भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; कमी तीव्रतेच्या धक्क्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट
4

Afghanistan Earthquake : पुन्हा एकदा भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; कमी तीव्रतेच्या धक्क्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.