क्षणात नष्ट झालं सगळं! पाकिस्तानाच्या महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan Flood News in Marathi : इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमध्ये भयकंर पूराने थैमान मांडले आहे. यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात, पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रचंड विध्वंस झाला आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोकांची घरे पाण्याखाली गेली आहे. जून महिन्याच्या अखेरीस सुरु झालेल्या पावसाने पाकिस्तानात मोठा गोंधळ उडाला आहे. इस्लामाबादमध्ये पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र परिस्थिती बिकट होत असताना पाकिस्तानचे सरकार हातात हात धरुन बसले आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या महितीनुसार आतापर्यंत ८८३ नागरिकांना प्राण गमावले आहेत, तर १,२०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान याच वेळ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक कुटुंब पुरातमध्ये वाहून गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी ही घटना घडली होती. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या स्वात नदीच्या महाभयंकर पुरात कुटुंबातील १८ सदस्य वाहून गेले असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. पाकिस्तानच्या बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे ५ लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या बचाव आणि शोध मोहीम सुरु आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुराच्या मध्यभागी एका दगडावर काही लोक उभे राहिले आहे. यामध्ये महिला आणि लहान मुले, वृद्ध व्यक्ती देखील आहे. पुराच्या पाण्याचा प्रवाह जोरदार असून चारी बाजूने पाणी वाहत आहे. इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच वेळी पाण्याची एक जोरदार लाट येते आणि संपूर्ण कुंटुंबाला सोबत घेऊन असल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
Thread of Heart-Breaking Moments in History When a Disaster Strikes 🧵
1. A tragic incident in Swat, Pakistan 💔 18 members of a single family swept away after flash floods hit the river Swat
pic.twitter.com/xq2jovrCN0— Earth_Wanderer (@earth_tracker) September 1, 2025
संरक्षण मंत्र्यांचे बेताल विधान
याच वेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ख्वाजा यांनी लोकांना पुराचे पाणी साठवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, जग पाण्याच्या समस्येशी झुंजत असताना देशात पडत असलेल्या पाऊस हा अल्लाहचा आशीर्वाद आहे. यामुळे पाणी साठवावे असे त्यांनी म्हटले आहे. सध्या सरकार काहीही करु शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शिवाय या सगळ्याचा आरोप भारतावर लावला जात आहे. भारतातून पाकिस्तानकडे वाहणाऱ्या झेलम, चिनाब, रावी, आणि सतलज या नद्यांना पूर आला आहे. याच वेळी भारताने धरण सोडल्याने हा पूर आला असल्याचा आरोप केला जात आहे.
सौदी अरेबियाचा भारताला धक्का! ‘या’ मोठ्या तेल उत्पादक कंपनीला कच्चा तेलाचा पुरवठा केला बंद