'आम्ही धमक्यांना घाबरत नाही...; विक्ट्री डे परेडमध्ये जागतिक नेत्यांसमोर चीनचे लष्करी ताकदीचे प्रदर्शन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
China Military Parade : बीजिंग : बुधवारी चीनमध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठे लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त ही परेड आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या परेडमध्ये चीनने आपले आधुनिक शस्त्रे आणि लष्कराचे प्रदर्शने केले. यावेळी दोन अत्याधुनिक लष्करी विमाने अधिकृतपणे ताफ्तात सामील करण्यात आली. ही परेड आतापर्यंतची सर्वात मोठी परेड मानली जात आहे.
दरम्यान या परेडच्या दोन दिवस आधीच चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषद पार पडली होती. या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहिले होते. पंतप्रधान मोदी जाताच चीनने आपली लष्करी ताकद दाखवण्यास सुरुवात केली. पण काही तज्ञांनी यावरुन भारतासाठी मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आता चीनशी वाढती जवळीकता भारतासाठी उत्तम ठरते की घातक हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या विक्ट्री परेड निमित्त चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंचावरुन संबोधित केले. त्यांनी म्हटले की, चीन कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही आणि नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहील. याच वेळी त्यांनी जनतेला जपानविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांनी श्रद्धांजली वाहण्याचे आणि इतिहास न विसरण्याचे आव्हान केली.
东风61陆基洲际导弹受阅 #VDayParade pic.twitter.com/V0XetOQ24r
— China Daily (@ChinaDaily) September 3, 2025
ही परेड चीनच्या इतिहासतील सर्वात भव्य परेड मानली जात आहे. याद्वारे चीनने संपूर्ण जगाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांच्या मते चीनला जगभरातील देशांना स्वत:कडे शस्त्रे खरेदी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेऐवजी ते एक उत्तम पर्याय बनू शकतात आणि पाश्चत्य देशांंचे नेतृत्व करु शकतात असा संदेश या लष्करी प्रदर्शनातून दिला जात आहे.
दरम्यान या विजय दिनाच्या परेडनिमित्त २५ देशांचे नेते उपस्थित होते. यामध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन, उत्तर कोरियाचे किम जोंग उन, तसेच इराण, मलेशिया, म्यानमार, मंगोलिया, इंडोनेशिया, झिम्बाब्वे आणि मध्य आशियाई देशांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच भारताच्या शेजारी देश पाकिस्तानचे शाहबाज शरीफ, नेपाळचे के.पी. शर्मा आणि मालदीवचे मोहम्मद मुइझ्झूही उपस्थित होते.