Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

India Japan economic partnership 2026 : भारतातील जपानी कंपन्यांची संख्या दुप्पट होऊन ३,००० होऊ शकते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. वाणिज्य मंत्री पियुष गोयल जपान दौऱ्यावर आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 27, 2026 | 10:47 AM
India Japan economic partnership 2026 Piyush Goyal Japan visit news

India Japan economic partnership 2026 Piyush Goyal Japan visit news

Follow Us
Follow Us:
  • गुंतवणुकीचे लक्ष्य लवकरच पूर्ण होणार
  • जपानी कंपन्यांची संख्या दुप्पट होणार
  • ‘डीपटेक कॅपिटल कॉरिडॉर’चा प्रस्ताव

भारत आणि जपान (India – Japan) यांच्यातील आर्थिक संबंध आणि द्विपक्षीय व्यापार एका नव्या सुवर्णकाळात प्रवेश करत आहेत. टोकियो दौऱ्यावर असलेले भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत-जपान आर्थिक भागीदारीबाबत अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक संकेत दिले आहेत. पुढील काही वर्षांत भारतातील जपानी कंपन्यांची संख्या दुप्पट होऊन जवळपास ३,००० पर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अनेक मोठ्या जपानी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून, ज्या क्षेत्रांमध्ये भारताकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे, तिथे जपानी कंपन्या तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे (Technology Transfer) भारताला सहकार्य करतील.

गेल्या वर्षी जपानने भारतामध्ये पुढील १० वर्षांच्या कालावधीत ६७ अब्ज डॉलर्स (सुमारे १० ट्रिलियन येन) गुंतवणुकीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी १० अब्ज डॉलर्सहून अधिक निधीची गुंतवणूक आधीच भारतात झाली आहे. गुंतवणुकीचा हा वेग पाहता, निर्धारित १० वर्षांऐवजी अवघ्या काही वर्षांतच हे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या गुंतवणुकीमुळे भारतीय उत्पादनाला नवी गती मिळेल आणि रोजगाराच्या लाखो नव्या संधी निर्माण होतील.

डीपटेक कॅपिटल कॉरिडॉर आणि ‘शार्क टँक’ धर्तीवर पिचिंग प्लॅटफॉर्म

भारत आणि जपान दरम्यानच्या आर्थिक सहकार्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘डीपटेक कॅपिटल कॉरिडॉर’ (DeepTech Capital Corridor) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सेमीकंडक्टर, स्पेस, रोबोटिक्स आणि डेटा सेंटर्स यांसारख्या प्रगत क्षेत्रांतील भारतीय स्टार्टअप्सना जपानी वित्तीय संस्थांकडून सहजरीत्या निधी (Patient Capital) उपलब्ध करून देणे हा या कॉरिडॉरचा मुख्य हेतू आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Geopolitics: जगात मोठ्या घडामोडींचे संकेत; महासत्तांमध्ये गुप्त वाटाघाटी, भारतासह ‘या’ देशांचे दिग्गज मंत्री विदेश दौऱ्यावर

टोकियो येथे जपानी उद्योजक आणि गुंतवणूकदारांसोबत झालेल्या बैठकीत पियुष गोयल यांनी ‘शार्क टँक’सारख्या ऑनलाईन पिचिंग प्लॅटफॉर्मची गरज अधोरेखित केली. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय तरुण उद्योजक थेट जपानी गुंतवणूकदारांसमोर त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना मांडू शकतील, ज्यामुळे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमला जागतिक स्तरावर भांडवल आणि तंत्रज्ञानाचे बळ मिळेल.

खाद्यपदार्थ निर्यात आणि मानकांची कठोर अंमलबजावणी

भारतीय कृषी आणि अन्न उत्पादनांना जपानच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे, त्यामुळे या उत्पादनांची निर्यात वाढवण्याची प्रचंड क्षमता भारताकडे आहे. मात्र, जपानचे अन्न आयात नियम आणि दर्जा मानके अत्यंत कठोर आहेत. पियुष गोयल यांनी स्पष्ट केले की, भारत या मानकांबाबत जपानशी सकारात्मक चर्चा करेल.

यासोबतच, विकसित देशांमध्ये निर्यात वाढवण्यासाठी भारतीय कंपन्यांना गुणवत्तेवर (Quality Control) भर द्यावा लागेल. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अंमलात आणलेल्या कठोर नियमांचे आणि गुणवत्तेच्या मानकांचे उदाहरण दिले. भारतीय कंपन्यांनी जागतिक मानकांचे तंतोतंत पालन केल्यास जपानसारख्या विकसित देशांमध्ये भारतीय उत्पादनांचा दबदबा निर्माण होऊ शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL

वाढती व्यापार तूट: भारतासाठी चिंतेची बाब

द्विपक्षीय गुंतवणुकीत वाढ होत असली, तरी भारत आणि जपानमधील वाढती व्यापार तूट (Trade Deficit) ही भारतासाठी चिंतेची मुख्य बाब ठरत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारत-जपान दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार सुमारे २७.५ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. मात्र, यामध्ये भारताची जपानला झालेली निर्यात केवळ ६.३ अब्ज डॉलर होती, तर जपानकडून होणारी आयात खूप जास्त होती.

ही व्यापार तूट कमी करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील व्यापार संतुलित करण्यासाठी Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) च्या पुनरावलोकनासाठीच्या कार्यकक्षा (Terms of Reference) लवकरच अंतिम केल्या जातील. जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून, भारताची निर्यात वाढवण्यासाठी विशेष सवलती आणि संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

Web Title: India japan economic partnership piyush goyal visit investment marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • India news
  • Japan
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळमध्ये भयानक जलप्रलय; भोटेकोशी नदीला अचानक आलेला पूर 47 गावांमध्ये शिरला, 162 जणांचा मृत्यू, 133 भारतीय बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळमध्ये भयानक जलप्रलय; भोटेकोशी नदीला अचानक आलेला पूर 47 गावांमध्ये शिरला, 162 जणांचा मृत्यू, 133 भारतीय बेपत्ता

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
2

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून
3

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
4

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.