
India Namibia Relations
भारत आणि नामीबियाने खनिजे, उर्जा आणि व्यापार क्षेत्रात महत्त्वपूर्ण रणनीतिक करार केला आहे. या करारमुळे दोन्ही देशांच्या संबंधांनी अधिक चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या करारमुळे युरेनियम, हिरे, आणि इतर मौलवान खनिजांच्या पुरवठ्यात वाढ होऊन गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे.
या नव्या कराराअंतर्गत नामीबियाकडून भारताला युरेनियम आणि हिरे यासांसरख्या खनिजांचा साठा उपलब्ध होणार आहे. यामुळे भारताच्या अणुउर्जा प्रकल्पामध्ये स्थैर्य मि निर्माण होईल. तसेच जेम्स अँड ज्वेलरी उद्योगालाही चालना मिळेल. तर भारत नामीबियाला पेट्रोलिम उत्पादने औषधे, अन्नधान्य, वाहने आणि आधुनिक तंत्रज्ञाचा पुरवठा करणार आहे.
या कराराच मोठा फायदा भारताच्या मायनिंग क्षेत्राला होणार आहे. तसेच उर्जा, आरोग्यसेवा, आणि आयटी क्षेत्रातही दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे. या गुंतवणूकीमुळे दोन्ही देशांमध्य रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकासाला चालना मिळणार आहे.
याशिवाय दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रा, गुटनिरपेक्ष चळवळ आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही सहकार्य मजबूत करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. उच्चस्तरीय पातळीवर चर्चेनंतर दोन्ही देशांतील करार अंतिम करण्यात ला असून हा करार भारत-आफ्रिका संबंधासाठी अधिक महत्त्वाच ठरणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, नामीबियासोबतच्या या सहकार्यामुळे भारताला उर्जा आणि खनिज सुरक्षेत मोठा फायदा होणार आहे. युरेनियम ते हिऱ्यांपर्यंतचा व्यापक करार भारताच्या आर्थिक, रणनीतिक आणि धोरणत्मक हितसंबंधांना अधिक उंचीवर नेईल. यामुळे भारताचे जागतिक पातळीवरी प्रभुत्व देखील अधिक मजबूत होईल.
भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप