World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच नॉर्वेने आपल्या नागरिकांना अधिकृत पत्रे पाठवली आहे. या पत्रांमध्ये इशारा देण्यात आला आहे कीस युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांची घरे, गाड्या, बोटी, यंत्रसामग्री, संरक्षणाच्या गरजेच्या वस्तू तात्पुरत्या काळासाठी ताब्यात घेतल्या जाऊ शकता. या प्रिपरेटरी रिक्विजिशन असे म्हणतात. नॉर्वे हा नाटोचा सदस्य देश असल्याने संघर्षाचा तीव्र धोका वाढला आहे. नॉर्वे रशियासोबत १९८ किमी भू-सीमा शेअर करतो. यामुळे या सीमेवर सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे पोलंडमध्ये देखील सरकारने नागरिक सुरक्षा मोहिम सुरु केली असून देशातील १.७ कोटी लोकांना वर्ल्ड वॉर थ्री सर्वाइव्हल गाईड वाटप केले आहे. या पुस्तकात आग, पूर, दहशतवादी हल्ले, सायबर हल्ले, अण्वस्त्र हल्ले, रासायनिक हल्ले या सर्वांपासून स्वत:चे आणि कुटुंबीयांचे कसे संरक्षण करायचे याची माहिती देण्यात आली आहे. सरकारचा हेतू नागरिकांना युद्धासाठी तयार करणे आहे. यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ते स्वत:चा बचाव करु शकतील.
ही तयारी फक्त नॉर्वे आणि पोलंडपुरती मर्यादित राहिलेली नाही. फ्रान्सने देखील युद्धासाठी नागरिकांना सतर्क केले आहे. तसेच नागरिकांसाठी युद्ध व आपत्कालीन मार्गदर्शक पत्रिका जाहीर केली आहे. तसेच जर्मनमध्ये लष्करी भरती सुरु करण्यात आली आहे. नागरी संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सध्या रशिया युक्रेन युद्धामुळे युरोपमध्ये संपूर्ण समीकरण बदलले आहे.
याच वेळी ग्रीनलँड मुद्यावरुनही अमेरिका आणि युरोपमध्ये तणाव वाढत चालला आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील देश असून तो अमेरिकेला देण्यासाठी डेन्मार्कच्या लोकांनी नकार दिला आहे. ट्रम्प यांनी हल्ल्याचे संकेत दिले आहे. यामुळे डेन्मार्क ग्रीनलँडमध्ये युद्ध सराव करत असून इतर युरोपीय देश देखील त्याच्या मदतीला धावून आले आहेत. सध्या या दोन्ही परिस्थितींमुळे युरोपमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
Ans: सध्या रशियासोबत असलेल्या सीमेवर युक्रेन युद्धामुळे तणावाचे वातावरण असून युद्ध किंवा गंभीर आपत्कालीन परिस्थिती लष्कर आणि संरक्षण यंत्रणेला संसाधनांची आवश्यकता भासेल. यासाठी नॉर्वे सरकार नागरिकांची घरे, वाहने किंवा तांत्रिक उपकरणे तात्पुरत्या काळासाठी जप्त करण्याची शक्यता आहे. याला प्रिपरेटरी रिक्विजिशन असे म्हणतात.
Ans: या पुस्तकात आग, पूर, दहशतवादी हल्ले, सायबर हल्ले, अण्वस्त्र हल्ले, रासायनिक हल्ले या सर्वांपासून स्वत:चे आणि कुटुंबीयांचे कसे संरक्षण करायचे याची माहिती देण्यात आली आहे.






