Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धबंदी काही काळापुरतीच, भारत पाकिस्तान युद्ध होणार; संरक्षण विश्लेषक प्रवीण साहनींचे भाकित

परराष्ट्र धोरण सुधारण्याची गरज असून ऑपरेशन सिंदूरनंतर युद्धबंदी ही काही काळापुरतीच असण्याची शक्यता आज डिफेन्स अ‍ॅनालिस्ट प्रवीण साहनी यांनी व्यक्त केली, जाणून घ्या अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 13, 2025 | 11:46 PM
भारत - पाकिस्तान युद्धाची सद्यस्थिती (फोटो सौजन्य - मुंबई प्रेस क्लब)

भारत - पाकिस्तान युद्धाची सद्यस्थिती (फोटो सौजन्य - मुंबई प्रेस क्लब)

Follow Us
Close
Follow Us:

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर झालेली शस्त्रसंधी हा केवळ एक स्वल्पविराम असून तो कधीही संपू शकतो आणि मला भीती आहे की ही युद्धबंदी पाकिस्तानकडूनच पहिले तोडली जाईल’ अशी शक्यता आज डिफेन्स अ‍ॅनालिस्ट प्रवीण साहनी यांनी व्यक्त केली आहे. द मुंबई प्रेस क्लब आयोजित साऊथ एशिया इन फ्लक्स : डिकोडिंग द न्यू जिओपॉलिटिकल ऑर्डर व्याख्यानात प्रवीण साहनी यांनी दक्षिण आशियामध्ये बदलत्या भू-राजकीय परिस्थिती आणि त्यात भारताची भूमिका याबाबत विश्लेषणात्मक भाष्य केले.  

याबाबत पुढे बोलताना त्यांनी आपले स्पष्ट मत मांडत सांगितले की ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने ज्या लष्करी कारवाई केल्या आहेत त्यामध्ये त्याच्या मर्यादा उघड झाल्या आहेत आणि यामुळेच पाकिस्तान नक्कीच युद्धाची तयारी करत असल्याचा कयास त्यांनी यावेळी मांडला. 

Israel Iran war : इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका; जागतिक एअर ट्राफिक परिणाम, भारताची विमानसेवा कोलमडली

भारत युद्धाच्या उंबरठ्यावर 

भारत देश हा युद्धाच्या उंबरठ्यावर असून मी केलेल्या अभ्यासानुसार आणि अंदाजानुसार, आपल्या देशावर पाकिस्तानकडून वर्षभरात पुन्हा हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता प्रवीण साहनी यांनी यावेळी वर्तवली आहे. इतकंच नाही तर भारताचा खरा शत्रू हा पाकिस्तान हा नसून त्याला पाठिंबा देत असलेला चीन आहे,  आणि हे भारतातील लष्कराने आणि सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी मत मांडले आहे. या गोष्टीमुळे भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात आमुलाग्र बदल न केल्यास मोठ्या संकटात सापडू शकतो, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे दिसून आले. 

रशिया, चीन आणि अमेरिकेची महासत्ता 

सध्या जगात अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच महासत्ता आहेत आणि आपल्या प्रभावाच्या बळावरच जगावर या तिन्ही देशांना राज्य करायचे आहे हे दिसून येत आहे. व्यापारी बळावर चीन आणि रशिया अधिकाधिक देशांना आपल्या बाजूला वळवत आहेत तर तिघांचेही लक्ष्य दक्षिण आशिया असल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट मत प्रवीण साहनी आपल्या अभ्यासातून मांडले.  

याशिवाय या सगळ्यामध्ये भारत नक्की काय करणार आहे आणि काय करत आहे याकडे आता लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. ८० टक्के देश हा महासत्तेकडे आकर्षित होत असून भारताची भूमिका ही संभ्रमाची असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे म्हटले. 

इस्रायलचा थेट इराणच्या छाताडावर वार; ‘Iranian octopus’चे सैन्य तयार, ‘Gulf countries’ युद्धाच्या छायेत

भारताने स्वतःला बळकट करावे 

भारताने झपाट्याने अर्थात लवकरात लवकर आपले लष्कराची संख्या कमी करुन वायूसेनेवर भर देण्याची आवश्यकता आहे. कारण, दुसऱ्या बाजूने पाकिस्तान देश हा चीनच्या मदतीने युद्धासाठी तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधानांनी हा फक्त स्वल्पविराम असून भविष्यातही कारवाई सुरु राहील असे स्पष्ट केले होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पण आपल्या अभ्यासानुसार, हा स्वल्पविराम पाकिस्तानकडून उठविण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे आपण युद्धाच्या उंबरठ्यावर असून त्यासाठी आपल्या परराष्ट्र धोरणात आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता साहनी यांनी व्यक्त केली. पहलगाम हल्ल्यानंतर तर चीनने पाकिस्तानच्या संरक्षणाची थेट हमीच देणे भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, असेही साहनी यांनी अधोरेखित केले.

या व्याख्यानाला राज्यसभा खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर, काँग्रेस नेते विश्वास उटगी आदी उपस्थित होते.

Web Title: India pakistan war will happen ceasefire will only last for a short time defense analyst praveen sahni predicts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 11:43 PM

Topics:  

  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.