इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका; जागतिक एअर ट्राफिक परिणाम, भारताची विमानसेवा कोलमडली (फोटो सौजन्य-X)
Israel Iran war News in marathi : इराणवरील इस्रायली हल्ल्यामुळे दोन्ही देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. इराण-इस्त्रायलच्या युद्धाचा भडका उडाल्याने त्याचा परिणाम जागतिक पातळीवर जाणवू लागला आहे. एअर ट्राफिक यामुळे कोलमडली असून भारताने या युद्धामुळे अनेक विमान उड्डाणं रद्द केली आहे. यात प्राथमिक माहितीनुसार 16-20 विमाने परत बोलवल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून लंडनला जाणारी AIC129 ही विमान कंपनी मुंबईला परत येत आहे. तर अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे इतर शहरांमध्ये वळवण्यात आली आहेत.
इराण आणि इस्रायलमधील सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. एअर इंडियाने अनेक उड्डाणे वळवली आहेत, तर अनेक उड्डाणे त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजेच जिथून त्यांनी उड्डाण केले होते तिथे परत पाठवली जात आहेत. यासोबतच पर्यायी उड्डाणांच्या सुविधेसह प्रवाशांसाठी राहण्याची व्यवस्थाही केली जात आहे.
AI130 लंडन हीथ्रो-मुंबई व्हिएन्ना वळवण्यात आली.
AI102 न्यू यॉर्क-दिल्ली शारजाहला वळवण्यात आली.
AI116 न्यू यॉर्क-मुंबई जेद्दाहला वळवली.
AI २०१८ लंडन हीथ्रो-दिल्ली मुंबई वळवली.
AI129 मुंबई-लंडन हीथ्रो मुंबईला परत येत आहे.
AI 119 मुंबई-न्यू यॉर्क मुंबईला परत येत आहे.
AI103 दिल्ली-वॉशिंग्टन दिल्लीला परत येत आहे.
AI106 नेवार्क-दिल्ली दिल्लीला परत येत आहे.
AI188 व्हँकूवर-दिल्ली जेद्दाहला वळवली.
AI101 दिल्ली-न्यू यॉर्क फ्रँकफर्ट/मिलान
AI126 शिकागो-दिल्ली जेद्दाहला वळवली.
AI132 लंडन हीथ्रो-बेंगळुरू शारजाहला वळवली.
AI2016 लंडन हीथ्रो-दिल्ली व्हिएन्नाला वळवली.
AI104 वॉशिंग्टन-दिल्ली व्हिएन्नाला वळवली जात आहे
AI190 टोरंटो-दिल्ली फ्रँकफर्टला वळवली जात आहे
AI189 दिल्ली-टोरंटो दिल्लीला परत येत आहे.
इराणमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी इस्रायली हल्ल्यांनंतर देशात उपस्थित असलेल्या भारतीयांना सतर्क राहण्याचा, सर्व अनावश्यक हालचाली टाळण्याचा आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता, सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या लोकांना सतर्क राहण्याची, सर्व अनावश्यक हालचाली टाळण्याची, दूतावासाच्या सोशल मीडिया अकाउंटचे अनुसरण करण्याची आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याची विनंती केली जाते.
इराण आणि इस्रायलमधील युद्ध कोणापासूनही लपलेले नाही. इराणबद्दल असे म्हटले जात आहे की ते अणुशस्त्रे बनवत आहे. इस्रायल आणि अमेरिकेसह इतर देशांना यावर आक्षेप आहे. या अणुप्रकल्पाला लक्ष्य करून इस्रायलने शुक्रवारी सकाळी इराणवर हल्ला केला आहे. ज्यामध्ये त्यांचा अणुप्रकल्प उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत इराण कधीही प्रत्युत्तर देऊ शकतो. म्हणूनच दोन्ही देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही विमानाला उड्डाण किंवा उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणूनच अनेक उड्डाणे परत येत आहेत तर अनेकांना दुसऱ्या मार्गाने पाठवले जात आहे.