Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या स्वदेशी लढाऊ विमानांच्या उत्पादनाला वेग; अमेरिकेकडून जेव्हलिन क्षेपणास्त्र आणि स्ट्रायकरही करणार खरेदी?

India-US defense ties : भारताच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनाला वेग मिळाला आहे. अमेरिकेने तेजस Mk1A लढाऊ विमानांसाठी लागणाऱ्या GE F404-IN20 इंजनची डिलिव्हरी सुरु केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2025 | 10:20 PM
India Ramps Up LCA Tejas Production as GE Begins Monthly Supply of F404 Jet Engines; US Defense Talks Progress

India Ramps Up LCA Tejas Production as GE Begins Monthly Supply of F404 Jet Engines; US Defense Talks Progress

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनाला वेग मिळाला आहे. अमेरिकेने तेजस Mk1A लढाऊ विमानांसाठी लागणाऱ्या GE F404-IN20 इंजनची डिलिव्हरी सुरु केली आहे. 2021 मध्ये भारताने अमेरिकन कंपनी जनरल इलेक्टिकसोबत 716 डॉलर्सचा करार केला होता. या अंतर्गत 99 इंजिन्सची खरेदी सुनिश्चित करण्यात आली होती. परंतु सप्लाय चेनमध्ये काही अडथळ्यांमुळे डिलिव्हरीला विलंब झाला होता. याशिवाय भारत अमेरिकेडून जेव्हलिन क्षेपणास्त्र आणि स्ट्रायकरही खरेदी करणार आहे.

2026 पर्यंत डिलिव्हरी पूर्ण होण्याची अपेक्षा

मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियाकडून काही कॉम्पोनंट्सचा पुरवाठ थांबला होता, यामुळे डिलिव्हरीसाठी अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान आता या इंजिनच्या डिलिव्हरीला सुरुवात झाली असून 2026 पर्यंत दर महिन्याला दोन लोकोमोटिव्ह डिलिव्हर होणार आहेत, अशी माहिती भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार यांनी दिली. एप्रिलमध्ये याचे पहिले इंजिन भारताला मिळेल आणि दुसरे इंजिन जुलैमध्ये मिळण्याची अपेक्षा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- सीरियामध्ये पुन्हा गृहयुद्धाचा भडका; सामुदायिक संघर्षात ३७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भारताच्या हवाई दलात सामील होणार 352 लढाऊ विमाने

भारताच्या हवाई दलात तेजस Mk1A आणि Mk2 प्रकाराचे 352 लढाऊ विमान सामाविष्ट होणार आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या विमानांचे उत्पादन करत आहे. 2026-27  पर्यंत दरवर्षी 30 युनिट्सचे उत्पादन केले जाणार आहे. HAL कडून उत्पादनात झालेल्या विलंबासाठी टीका करण्याच येत होती, परंतु आता या स्वदेशी विमानांच्या उत्पादनाला गती मिळाली आहे.

अमेरिकेकडून स्ट्राइकर आणि जेव्हलिनही खरेदी करणार भारत

तसेच भारत अमेरिकेकडून जेव्हलिन अँटी-टँक गाईडेड मिसाईल (ATGM)च्या खरेदीची देखील तयारी करत आहे. ‘फायर अँड फॉरगेट’साठी ओळखल्या जाणाऱ्या या मिसाईची क्षमता शत्रूंचे टॅंकर्सवर कमजोर भागांवर हल्ला करते. या क्षेपणास्त्राचा मारा २.५ किलोमीटरपर्यंत करतो येतो. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक लढाईसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सध्या भारताकडे दुसऱ्या पिढीचे ATGM क्षेपणास्त्र आहेत. पण 68 हजार पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे आणि 850 लॉंटर्सची कमतरता आहे.

याशिवाय भारताने अमेरिकेच्या स्ट्रायकर आर्मरड व्हेईकलेच्या खरेदीसाठी त्याचे परिक्षण केले आहे. परंतु सध्या व्हेरिएंट च्या खरेदीची शक्यता कमी आहे. लष्कर एका Amphibious म्हणजेच पाण्यात आणि जमिनीवर चालणाऱ्या व्हेरिएंटची मागणी करत आहे. स्ट्रायकरमध्ये 30 mm तोफ, मशीन गन आणि AGTM तैनात करण्याची जागा आहे. यामध्ये NBC संरक्षण प्रणाली असून हे वाहन नेटवर्क सेंट्रिक युद्धासाठी तयार करण्यात आले आहे. भविष्यात भारताच्या Future Infantry Combat Vehicle योजनेचा स्ट्रायकर भाग बनू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- क्रूरतेची मर्यादा ओलांडली! आधी बेदम मारहाण अन् नंतर मृतदेहावर नाचले लोक ; बांगलादेशात हिंदू व्यापाऱ्याची हत्या, VIDEO VIRAL

Web Title: India ramps up lca tejas production as ge begins monthly supply of f404 jet engines us defense talks progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 10:20 PM

Topics:  

  • America
  • Defence Sector
  • World news

संबंधित बातम्या

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
1

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता
2

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
3

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
4

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.