Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Defense: Russia ‘आऊट’, India ‘इन’! भारतीय विनाशकारी शस्त्रास्त्रांचा आर्मेनियात धुमाकूळ; रशियाची मक्तेदारी संपली?

India Armenia Weapon Export: दशकभरापूर्वीपर्यंत, अर्मेनिया आपल्या शस्त्रास्त्रांपैकी जवळपास ९०% शस्त्रे रशियाकडून आयात करत असे. परंतु आता रशियाचा वाटा १० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 08, 2026 | 12:42 PM
india replaces russia armenia defense export deal 16000 crore 2026

india replaces russia armenia defense export deal 16000 crore 2026

Follow Us
Follow Us:
  • रशियाची मक्तेदारी संपली
  • भारताचा ऐतिहासिक ‘डिफेन्स’ करार
  • पुतिन यांना मोठा झटका

India Armenia Defense Deal 2026 : जागतिक राजकारणाच्या बुद्धिबळावर सध्या अतिशय वेगाने हालचाली सुरू आहेत. एकेकाळी रशियाचा ‘उपग्रह’ मानला जाणारा आर्मेनिया आता रशियाच्या (Russia) प्रभावातून बाहेर पडला असून त्याने भारतासोबत आपले भविष्य जोडले आहे. दक्षिण कॉकेशस प्रांतात सुरू असलेल्या या भू-राजकीय बदलाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्मेनियाने रशियाकडून होणारी ९०% शस्त्र आयात आता १० टक्क्यांहून खाली आणली असून, भारताला आपला सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार देश बनवले आहे. हा बदल केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून तो पुतिन प्रशासनासाठी एक मोठा राजनैतिक पराभव मानला जात आहे.

युक्रेन युद्धाचा परिणाम आणि बदललेली समीकरणे

युक्रेनसोबतच्या प्रदीर्घ युद्धात रशिया अडकल्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या जुन्या मित्रराष्ट्रांवरून कमी झाला आहे. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील संघर्षात रशियाने अपेक्षित मदत न केल्यामुळे आर्मेनियाचा रशियन शस्त्रांवरील विश्वास उडाला आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या दोन युद्धांमध्ये आर्मेनियाने मोठी हानी सोसली. परिणामी, आर्मेनियाने पश्चिमेकडील देश आणि भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संधीचा फायदा घेत आर्मेनियाला लष्करी आणि राजनैतिक पाठबळ दिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indian Navy: व्हिएतनाममध्ये भारताच्या फ्लोटिंग लॅबोरेटरी ‘INS Sagardhwani’चे जंगी स्वागत; सागरी विज्ञानाचे नवे रहस्य उलगडणार

भारतीय शस्त्रास्त्रांचा आर्मेनियात धुमाकूळ

आर्मेनिया आता भारताचा सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश बनला आहे. २०२२ पासून आर्मेनियाने भारताकडून सुमारे २ अब्ज डॉलर्स म्हणजेच १६,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीची शस्त्रे खरेदी केली आहेत.

यामध्ये खालील प्रमुख प्रणालींचा समावेश आहे:

१. पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर: अझरबैजानच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हे अत्यंत प्रभावी ठरत आहे.

२. आकाश-१एस क्षेपणास्त्र प्रणाली: हवाई संरक्षणासाठी भारताची ही स्वदेशी प्रणाली आता आर्मेनियाच्या सीमांचे रक्षण करत आहे.

३. प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र: वृत्तानुसार, भारताने आपले घातक ‘प्रलय’ क्षेपणास्त्रही आर्मेनियाला दिले आहे, ज्यामुळे त्यांच्या आक्रमक क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.

४. एटीएजीएस आणि मारग तोफा: भारतीय बनावटीच्या या तोफा आता आर्मेनियाच्या तोफखान्याचा कणा बनल्या आहेत.

याशिवाय, आर्मेनिया आपल्या सुखोई (Su-30) विमानांना भारतीय मानकांनुसार (Su-30MKI) अपडेट करण्यासाठी आणि नवीन विमाने खरेदी करण्यासाठी सुमारे ३ अब्ज डॉलर्सच्या महाकरारावर चर्चा करत आहे.

India–Armenia Talks Advance for Pralay, Astra & Su-30 Upgrades 🇮🇳🇦🇲🔥 India and Armenia have entered advanced negotiations for exporting high-end Indian systems including Pralay missile, Astra Mk1, and Su-30SM upgrades. > Pralay quasi-ballistic missile under cost talks
> Range:… pic.twitter.com/SDcoR4H7MT
— The Tathya (@_TheTathya) May 2, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Prehistoric Sea Monster : डायनासोर काळात ‘हा’ प्राणी होता समुद्राचा खरा राजा; शास्त्रज्ञांना सापडले 62 फूट लांबीचे जीवाश्म

युरोपियन युनियनकडे आर्मेनियाची वाटचाल

आर्मेनियाने नुकतेच येरेवानमध्ये युरोपियन राजकीय समुदाय (EPC) शिखर परिषदेचे आयोजन केले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आर्मेनियाला रशियाचे ५,००० सैनिक मायदेशी धाडण्याचा सल्ला दिला आहे. आर्मेनिया आता स्वतःला युरोपियन युनियनच्या (EU) जवळ नेत असून रशियाचे युग संपल्याचे संकेत दिले आहेत. भारताने केवळ शस्त्रेच दिली नाहीत, तर आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरच्या (INSTC) माध्यमातून आर्मेनियाला जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचे आश्वासनही दिले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आर्मेनियाने रशियाकडून शस्त्रे घेणे का बंद केले?

    Ans: अझरबैजानसोबतच्या युद्धात रशियाने मदत न केल्यामुळे आणि युक्रेन युद्धामुळे रशियाच्या स्वतःच्या पुरवठा साखळीत अडथळे आल्यामुळे आर्मेनियाचा विश्वास उडाला आहे.

  • Que: भारताने आर्मेनियाला कोणती प्रमुख शस्त्रे दिली आहेत?

    Ans: भारताने पिनाका रॉकेट लाँचर, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, एटीएजीएस तोफा आणि प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आर्मेनियाला पुरवली आहेत.

  • Que: भारत-आर्मेनिया संरक्षण करार किती कोटींचा आहे?

    Ans: २०२२ पासून आतापर्यंत आर्मेनियाने भारताकडून १६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची शस्त्रे खरेदी केली आहेत.

Web Title: India replaces russia armenia defense export deal 16000 crore 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • India-Russia Relation
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
1

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
2

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
3

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी
4

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.