Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीयांना मिळणार रोजगार तर रशियन नागरिकांना…; जाणून घ्या भारत अन् रशियात कोणते करार करण्यात आले?

India Russia 7 Agreements : भारत आणि रशियाचे संबंध अधिक बळकट होत चालले आहेत. नुकतेच पुतिन यांच्या दौऱ्यावेळी दोन्ही देशांमध्ये सात महत्त्वपूर्ण करार करण्यात आले, ज्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधाना नवी दिशा मिळाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 06, 2025 | 01:51 PM
Putin and Modi

Putin and Modi

Follow Us
Close
Follow Us:
  • पुतिन यांचा भारत दौरा सफल
  • भारत आणि रशियामध्ये सात महत्त्वपूर्ण करार
  • रशियन नागरिकांसाठी पंतप्रधान मोदींची खास घोषणा
India Russia Relations : नवी दिल्ली/मॉस्को : भारत आणि रशियाच्या मैत्रीने सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी भारताचा दौरा केला. यावेळी पुतिन यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातही खास बैठक झाली. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत भारत आणि रशिया संबंधाला अधिक बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत. याचा दोन्ही देशांच्या नागरिकांना अधिक फायदा होणार आहे. आज आपण दोन्ही देशांतील सात महत्त्वपूर्ण करारांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

पुतिन भारतातून परतताच शांततेसाठी हालचाल; अमेरिका-युक्रेनने रशियासमोर ठेवली नवी अट

शुक्रवारी (५ डिसेंबर) पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे बैठक पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय चर्चेनंतर महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी केली. यावेळी दोन्ही देशांत कामगार, स्थलांतर, आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा, जहाजबांधणी, रसायने आणि खते यांसारख्या मुद्यांवर करार करण्यात आला. तसेच रशियन नागरिकांसाठी पंतप्रधान मोदींनी खास घोषणा देखील केली.

भारत आणि रशियातील सात महत्त्वपूर्ण करार खालीलप्रमाणे 

  • सहकार्य आणि स्थलांतर करार
  • तात्परते कामगार उपक्रम – सध्या रशियामधील बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत तात्पुरता कामगार करार करण्यात आला आहे. याअंतर्गत भारतीय कामगांराना रशियामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
  • आरोग्यसेवा, वैद्यकीय सेवा – तसेच दोन्ही देशांत आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील भागीदारी वाढविण्यावर देखील सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • अन्न सुरक्षा आणि मानक – भारत आणि रशिया संयुक्तपणे अन्न सुरक्षा आणि शेतकरी कल्ल्याणासाठी कार्य करणार आहे.
  • ध्रुवीय जहाजबांधणी करार – याचबरोबर भारत आणि रशियात जहाजाच्या बांधणीसाठी आणि त्याच्या प्रशिक्षणासाठी देखील महत्वपूर्ण करार करण्यात आला आहेत. यामुळे मेक इन इंडिया धोरणाला ताकद मिळेल, तसेच तरुणांसाठी रोजगार, कौशल्य आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला बळ मिळेल.
  • याशिवाय दोन्ही देशांतील सागरी सहकार्य वाढविण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे.
  • खत सहकार्य करार – भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात युरिया खरेदी करतो. पण या नव्या करारानुसार, आता दोव्ही देश संयुक्तपणे युरियाचे उत्पादन करणार आहे.

रशियन नागरिकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त परिषदेच्या बैठकीदरम्यान रशियन नागरिकांसाठी एक मोठी घोषणा देखील केली आहे. रशियाच्या नागरिकांना आता ३ भारताचा मोफत ई-टुरिस्ट व्हासा देण्यात येणार आहे. हा व्हिसा ३० दिवसांसाठी मोफत स्वरुपात दिला जाणार आहे.

‘ट्रम्पने भारताची माफी मागावी’ ; पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याचे खळबळजनक विधान

Web Title: India russia relations agreements vladimir putin narendra modi news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • India Russia relations
  • narendra modi
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयारण होणार, अमेरिकेचा जळफळाट
1

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयारण होणार, अमेरिकेचा जळफळाट

Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप
2

Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप

Imran Khan : पाकिस्तानमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय? इम्रान खान यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवलं, पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ
3

Imran Khan : पाकिस्तानमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय? इम्रान खान यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवलं, पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

Parliament Budget Session 2026 : ही भारताच्या प्रगतीचे नवे युग; संसदेच्या आवारात PM मोदींचे महत्त्वपूर्ण भाष्य
4

Parliament Budget Session 2026 : ही भारताच्या प्रगतीचे नवे युग; संसदेच्या आवारात PM मोदींचे महत्त्वपूर्ण भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.