'ट्रम्पने भारताची माफी मागावी' ; पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याचे खळबळजनक विधान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पेंटगॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) उपहासात्मक टिप्पणी करत म्हटले की, ट्रम्प यांना भारत आणि रशियाला एकत्र आणण्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे. त्यांच्या भारतविरोधी धोरणामुळेच दोन्ही देश एकत्र आले आहेत. पुतिन यांचा भारत दौरा हा अतिशय सकारात्मक झाला आहे. भारताने पुतिन यांना असा सन्मान दिला आहे, जो जगात इतरत्र क्वचितच मिळेल. आणि याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना जाते असे मायकेल रुबिन यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांतील सामंजस्य करार प्रत्याक्षात पूर्ण होती. त्यांच्या निर्णायंमुळे दोन्ही देशांचे हितसंबंध अधिक मजबूत होतील. ट्रम्प यांच्या पंतप्रधान मोदी आणि भारताप्रती विरोधी धोरणामुळे भारत आणि रशिया एकत्र आले आहेत. यामुळे त्यांना नोबेल देण्याची मागणी मायकेल यांनी केली आहे.
ट्रम्पला भारताची माफी मागण्यासही मायकेल यांनी सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, गेल्या वर्षभरात अमेरिका भारताशी ज्या पद्धतीने वागला आहे, त्याबद्द उघडपणे माफी मागितली पाहिजे. अमेरिकेच्या लोकशाहीत्या हितासाठी अहंकार बाजूला ठेवणे मोठे आहे असे मायकेल यांनी म्हटले.
तसेच त्यांनी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या पाकिस्तानवरील धोरणांवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्रा आहे आणि अमेरिका त्याला आंलिहन मारत आहेत. यामागे कोणतेही तर्क नाही. त्यांच्या मते, दहशतवादाला प्रोत्साहन देण्याऱ्या असीम मुनीरला (Asim Munir) सन्मानित करण्याऐवजी तातडीने अटक झाली पाहिजे. पडद्यामागे राजनैतिक शांततेसाठी हे महत्त्वाचे असल्याचे मायकेल यांनी म्हटले.
#WATCH | Washington, DC, USA | “Donald Trump deserves a Nobel Prize for bringing India and Russia together the way he did”, says Former Pentagon official Michael Rubin on Russian President Vladimir Putin’s visit to India. He further says, “From Russia’s perspective, the visit… pic.twitter.com/vYXcVTwP7M — ANI (@ANI) December 5, 2025
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी टीका केली आहे.
Ans: पेटांगॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणत असीम मुनीरच्या अटकेची मागणी केली.
Ans: मायकेल यांच्या मते, भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य वाढवण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विशेष भूमिका बजावली आहे. यामुळे त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात यावे अशी टीका मायकेल यांनी केली आहे.
Ans: मायकेल यांच्या मते, गेल्या वर्षभरात अमेरिका आणि ट्रम्प प्रशासनाने भारताशी अयोग्य वर्तन केले आहे. यासाठी अमेरिकेने त्यांची उघडपणे माफी मागावी असे म्हटले आहे.






