पुतिन भारतातून परतताच शांततेसाठी हालचाल; अमेरिका-युक्रेनने रशियासमोर ठेवली नवी अट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपल्यावर युक्रेनच्या सुरक्षेसाठी यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे. यासाठी आज युक्रेन आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची भेट होईल. अमेरिकेने रशिया आणि युक्रेनला शांततेसाठी वचनबद्ध राहण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेने फ्लोरिडामध्ये झालेल्या बैठकीनंतर एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनात सांगण्यात आहे की, रशिया दीर्घकाळ शांततेसाठी गंभीर असेल तर करार शक्य आहे.
तसेच यावर युक्रेनने देखील कायम राहावे. अन्यथा दोन्ही देशांत तणाव सतत वाढेल, निरापराध लोकांच्या हत्या होतील. सध्या या थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज अमेरिकेने अधोरेखित केली आहे. अमेरिकेने पुढे म्हटले आहे की, भविष्यातील परिस्थितीचा आढा घेण्यात आला आहे. यानुसार, युक्रेनमध्ये युद्धबंदीनंतर पुनर्बांधणी करणे आणि संयुक्त अमेरिका-युक्रेन आर्थिक प्रकल्प विकसित करणे, सहकार्य मजबूत करण्याचा उद्देश असेल.
यापूर्वी मंगळवारी (२ डिसेंबर) अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी पुतिन यांची भेट घेतली होती. यावेळी ट्रम्प यांच्या २८ कलमी शांतता योजनेवर चर्चा करण्यात आली. (Vladimir Putin Steve Witkoff Meet ) यावेळी पुतिन यांनी स्पष्ट केले होते की, युक्रेन डोनबास प्रदेश रशियाला सोपवत नाही तोपर्यंत कोणताही करार होणार नाही. दरम्यान या चर्चेनंतर फ्लोरिडामध्ये युक्रेनच्या अधिकाऱ्यांसोबत अमेरिकेने बैठक घेतली.
यावेळी क्रेमलिनमध्ये झालेल्या चर्चेची पूर्ण माहिती वोलोडिमिर झेलेन्स्की यांना देण्यात आला. या बैठकीवेळी झेलेन्स्की यांनी पुतिनवर चर्चा लांबवल्याचा आणि सतत युक्रेनवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा अमेरिकन आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांची भेट होणार आहे. या भेटीकडे सर्वांचे लक्ष्य लागले असून पुतिन यांच्या अटी झेलेन्स्की मान्य करतात का नाही यावर सध्या चर्चा सुरु आहे. गेल्या चार वर्षापासून हे युद्ध सुरु आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
Ans: अमेरिकेने शांततेसाठी वचनबद्ध राहण्याचे आवाहन रशियाला केले आहे.
Ans: झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पुतिन यांनी चर्चा विनाकारण लांबवली आहे. तसेच युक्रेनवर सतत हल्ले केले आहेत.
Ans: गेल्या चार वर्षापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे.






