Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅलेस्टिनींना भारताची साथ; संयुक्त राष्ट्र महासभेत इस्त्रायलविरोधी प्रस्तावाच्या बाजूने मतदान, 157 देशांचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने इस्रायलविरोधी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रस्तावात इस्रायलने 1967 पासून कब्जा केलेल्या पूर्व जेरुशलमसह पॅलेस्टिनी प्रदेशातून माघार घ्यावी असे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 05, 2024 | 11:42 AM
पॅलेस्टिनींना भारताची साथ; संयुक्त राष्ट्र महासभेत इस्त्रायलविरोधी प्रस्तावाच्या बाजूने मतदान, 157 देशांचा पाठिंबा

पॅलेस्टिनींना भारताची साथ; संयुक्त राष्ट्र महासभेत इस्त्रायलविरोधी प्रस्तावाच्या बाजूने मतदान, 157 देशांचा पाठिंबा

Follow Us
Close
Follow Us:

संयुक्त राष्ट्र: संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने इस्रायलविरोधी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रस्तावात इस्रायलने 1967 पासून कब्जा केलेल्या पूर्व जेरुशलमसह पॅलेस्टिनी प्रदेशातून माघार घ्यावी आणि पश्चिम आशियात व्यापक, न्याय व शाश्वत शांतता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती. 193 सदस्यीय महासभेत सेनेगलने मांडलेला “पॅलेस्टिनी प्रश्नाचे शांततामय समाधान” असा हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.

157 देशांचा पाठिंबा, 8 देशांचा विरोध

या प्रस्तावाला भारतासह एकूण 157 देशांनी मंजूरी दिली. दरम्यान, इस्रायल, अमेरिका, अर्जेंटिना, हंगेरी, माइक्रोनेशिया, नाउरू, पलाऊ आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी प्रस्तावाला विरोध केला आहे. तर  कॅमेरून, झेकिया, इक्वाडोर, जॉर्जिया, पॅराग्वे, युक्रेन आणि उरुग्वे या देशांनी मतदान टाळले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Violence: ‘बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा अंतरिम सरकारची जबाबदारी’; अमेरिकन संसंदचे वक्तव्य

जनसांख्यिकीय बदलास नकार

संयुक्त राष्ट्राच्या या ठरावाला विलंब न करता पश्चिम आशियामध्ये सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीचा या ठरावात पुनरुच्चार झाला. तसेच जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय चौकटीत 1967 पूर्वीच्या सीमांवर आधारित दोन राष्ट्रांच्या  सीमांमध्ये शांतता आणि सुरक्षेमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या द्वि-राज्य समाधानासाठी आपल्या समर्थनाची पुष्टी केली.

तसेच गाझा पट्टीत जनसांख्यिकीय किंवा क्षेत्रीय बदलाच्या प्रयत्नांना स्पष्टपणे नाकारले. या प्रस्तावात जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या 19 जुलै 2024 च्या सल्लागार मताचा संदर्भ दिला गेला, यामध्ये इस्रायलने पॅलेस्टिनी प्रदेशातील अनधिकृत वस्ती त्वरित संपवावी, नवीन वसाहती थांबवाव्यात आणि अनधिकृत वसाहतदारांना बाहेर काढावे, असे सांगितले आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

गाझा पट्टी पॅलेस्टिनी लोकांचा अविभाज्य भाग

प्रस्तावानुसार गाझा पट्टी ही 1967 च्या आधीपासूनच पॅलेस्टिनी नागरिकांचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे गाझा पट्टीतील लष्करी हल्ले, हिंसाचार, विध्वंस आणि दहशतवादी कारवाया तातडीने थांबवण्याचे आवाहन करण्यात आले. हिंसाचाराच्या सर्व कृत्यांचा तात्काळ आणि पूर्ण अंत करण्याच्या गरजेवर या ठरावात भर देण्यात आला.

भारताचे मतदान

भारतानेही इस्रायलने गोलन हाइट्सवरील कब्जा सोडावा, या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. हा प्रस्ताव 97 मतांनी मंजूर झाला, तर 64 देशांनी मतदान टाळले आणि आठ देशांनी विरोध केला. विरोध करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि इस्रायलचा समावेश आहे. भारताने या महत्त्वपूर्ण प्रस्तावाच्या बाजूने उभे राहून फलस्तीनच्या न्याय्य हक्कांना पाठिंबा दर्शवला आहे आणि पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला पाठबळ दिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘कॅनडा होणार अमेरिकेचा भाग…’; ट्रम्प यांचा जस्टिन ट्रुडोंना सल्ला, नेमकं प्रकरण काय?

Web Title: India supports palestinians voted in favor favor un general assembly nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • Hamas
  • Hezbollah
  • Israel

संबंधित बातम्या

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
1

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत
2

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा
3

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान
4

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.