Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exercise Maitree-XV: 9 व्या गोरखा रायफल्सचे शूर सैनिक थायलंडच्या भूमीत; पहा भारत-थायलंड संयुक्त युद्धसरावाचे ‘हे’ खास क्षण

भारत आणि थायलंड यांच्यातील १५ वा संयुक्त लष्करी सराव 'मैत्री-XV' हा १८ ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान थायलंडमध्ये आयोजित केला जात आहे. दहशतवादविरोधी कारवाया आणि जंगल युद्धातील कौशल्ये वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 21, 2026 | 04:45 PM
Exercise Maitree XV 2026

Exercise Maitree XV 2026

Follow Us
Follow Us:
  • ‘मैत्री-XV’ सरावाला सुरुवात
  • दहशतवादविरोधी आणि जंगल युद्ध सराव
  • मुए थाई आणि आधुनिक युद्धाभ्यास

भारत आणि थायलंड (thailand) यांच्यातील लष्करी संबंध आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामधील १५ वा संयुक्त लष्करी सराव ‘मैत्री-XV’ (Exercise MAITREE-XV 2026) थायलंडमधील सुरत थानी येथील विभावडी रंगसिट कॅम्पमध्ये १८ ऑगस्टपासून सुरू झाला असून तो ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणार आहे. या सरावामध्ये भारतीय सैन्य आणि रॉयल थाई आर्मीचे सैनिक एकत्र येऊन आधुनिक युद्धकौशल्ये, दहशतवादविरोधी मोहिमा आणि आपत्कालीन रणनीतींचे आदानप्रदान करत आहेत. या युद्धाभ्यासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय सैनिकांना थायलंडची प्रसिद्ध आणि अत्यंत घातक पारंपरिक मार्शल आर्ट ‘मुए थाई’चे (Muay Thai) विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.

या १५ व्या आवृत्तीत भारतीय सैन्याच्या वतीने ९ व्या गोरखा रायफल्सच्या शूर सैनिकांची तुकडी सहभागी झाली आहे. तर रॉयल थाई आर्मीच्या वतीने २५ व्या इन्फंट्री ब्रिगेडच्या तिसऱ्या बटालियनचे (५ वी डिव्हिजन) सैनिक यात प्रतिनिधित्व करत आहेत. दोन्ही देशांचे प्रत्येकी पंच्याऐंशी (८५) सैनिक या कंपनी-स्तरीय संयुक्त प्रशिक्षणाचा भाग बनले आहेत. रॉयल थाई आर्मीच्या चौथ्या आर्मी एरियाचे कमांडर लेफ्टनंट जनरल नोराथिप फोनोक यांच्या प्रमुख उपस्थितीत या सरावाचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. २००६ मध्ये सुरू झालेला हा ‘मैत्री’ सराव दोन्ही देशांच्या लष्करी मैत्रीचा एक भक्कम पाया मानला जातो.

जंगल युद्ध, ड्रोन तंत्रज्ञान अन् खंदक साफ करण्याचे धडे

‘मैत्री-XV’ या लष्करी सरावाचा मुख्य उद्देश जंगल आणि निमशहरी (Semi-urban) भागांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN Charter Chapter VII) तत्त्वांतर्गत दहशतवादविरोधी आणि बंडखोरीविरोधी कारवायांचा अनुभव शेअर करणे हा आहे. आजच्या आधुनिक युद्धकाळात अतिशय बिकट परिस्थितीत कसे टिकून राहावे, याचे कडक धडे सैनिकांना दिले जात आहेत. या सरावादरम्यान दोन्ही देशांचे सैन्य जंगलात टिकून राहण्याचे तंत्र (Jungle Survival Skills), युद्धभूमीत जखमी सैनिकांना बाहेर काढणे (Casualty Evacuation), तातडीचे प्रथमोपचार आणि शत्रूचे खंदक साफ करणे (Trench Clearing Ops) यांसारख्या अत्यंत कठीण कौशल्यांचा सराव करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात

याशिवाय, आधुनिक युद्धनीतीत क्रांती घडवणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचा (UAV – Unmanned Aerial Vehicles) संयुक्त मोहिमांमध्ये कसा प्रभावी वापर करायचा, याचे विशेष प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण सैनिकांना दिले जात आहे. सैनिकांमध्ये रणनीतिक चर्चा, व्याख्याने, आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि शेवटी कठीण प्रमाणीकरण सराव (Validation Exercise) आयोजित केला जाणार आहे. यामुळे दोन्ही सैन्यांमधील परस्पर समन्वय (Interoperability) आणि क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

‘मुए थाई’ प्रशिक्षण: ८ अंगांची कला अन् सैनिकांची शारीरिक तंदुरुस्ती

या सरावातील सर्वात रोमांचक आणि चर्चेत असलेला भाग म्हणजे भारतीय सैनिकांना दिले जाणारे ‘मुए थाई’चे प्रशिक्षण. मुए थाई ही थायलंडची शतकानुशतके जुनी आणि जगप्रसिद्ध मार्शल आर्ट शैली आहे. याला “आठ अंगांची कला” (Art of Eight Limbs) असेही म्हटले जाते. कारण यामध्ये लढताना सैनिकाला आपल्या दोन मुठी (Fists), दोन कोपर (Elbows), दोन गुडघे (Knees) आणि दोन पाय/नडगी (Shins) यांचा शस्त्र म्हणून अत्यंत वेगाने वापर करावा लागतो.

🇮🇳🇹🇭 #ExerciseMAITREEXV
भारत और थाईलैंड के बीच संयुक्त सैन्य अभ्यास MAITREE-XV का 15वां संस्करण 18–31 अगस्त 2026 तक थाईलैंड के सूरत थानी स्थित विबावादी रंगसित कैंप में आयोजित किया जा रहा है।
⚔️ अभ्यास में भारतीय सेना और रॉयल थाई आर्मी के 85-85 सैनिक हिस्सा ले रहे हैं। भारतीय दल… pic.twitter.com/ZpDoR5MOrd
— Madhurendra kumar मधुरेन्द्र कुमार (@Madhurendra13) August 21, 2026

credit – social media and Twitter

जवळच्या लढाईत (Close Quarter Combat) शत्रूवर नजीकच्या अंतरावरून कसा प्रहार करायचा, यासाठी हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त ठरते. या प्रशिक्षणामुळे भारतीय गोरखा सैनिकांची तंदुरुस्ती, चपळता, आत्मसंरक्षण क्षमता आणि रणनीतिक लवचिकता आणखी वाढणार आहे. केवळ युद्धकौशल्यच नाही, तर या क्रीडा-प्रशिक्षणामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आपुलकीचे नाते निर्माण होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Election Funding: अमेरिकन राजकारणात क्रिप्टो आणि AI कंपन्यांचा धुमाकूळ; निवडणुकीतील देणगीचे झाले सर्व रेकॉर्ड ब्रेक

भारत-थायलंडचे धोरणात्मक संबंध आणि प्रादेशिक सुरक्षितता

भारत आणि थायलंड यांच्यात ऐतिहासिक काळापासून सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध आहेत. ‘अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी’ (Act East Policy) आणि ‘सागर’ (SAGAR) व्हिजनअंतर्गत भारत आणि थायलंडमधील हा लष्करी सराव हिंद-प्रशांत (Indo-Pacific) क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये ‘मैत्री’ सरावाची १४ वी आवृत्ती भारतातील उमरोई, मेघालय येथे पार पडली होती. आता थायलंडच्या भूमीत होणारा हा १५ वा सराव दोन्ही देशांच्या लष्करी सहकार्याला एका नव्या उंचीवर घेऊन जात आहे.

३१ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या सरावाच्या शेवटी दोन्ही देशांचे सैनिक एका मोठ्या प्रात्यक्षिक युद्धमोहिमेत एकत्र सहभागी होऊन स्वतःच्या कौशल्यांची चाचणी घेतील. हा सराव केवळ दोन सैन्यांमधील सहकार्य वाढवत नाही, तर आशियाई खंडात दहशतवादाविरुद्ध लढा देण्याची दोन्ही राष्ट्रांची दृढ कटिबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट करतो.

Web Title: India thailand joint military exercise maitree xv 2026 muay thai training marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • defense force
  • India news
  • thailand

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026:  पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
1

Maharashtra Breaking News Today 2026: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ
2

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ

India-Japan चर्चेकडे जगाचे लक्ष! मोदी-कोइझुमी भेट खास ठरणार; सागरी मार्ग सुरक्षा अन् तंत्रज्ञानाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय
3

India-Japan चर्चेकडे जगाचे लक्ष! मोदी-कोइझुमी भेट खास ठरणार; सागरी मार्ग सुरक्षा अन् तंत्रज्ञानाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय

Maharashtra Breaking News Today 2026: जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
4

Maharashtra Breaking News Today 2026: जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.