PM Modi and Trump likey to Meet soon
Donald Trump and PM Modi Meet : नवी दिल्ली/वॉशिंग्टन : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) नुकतेच अमेरिकेला संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ८० व्या अधिवेशनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी समकक्ष अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिका संबंध स्थिर करण्यावर चर्चा केली.
दरम्यान या भेटीनंतर मार्को रुबियो यांच्याकडून भारतावरील कर (Tarrif) कमी होण्याच्या शक्तेचे संकेत मिळाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याही भेटीचा इशारा मिळाला आहे. NBC न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मार्को रुबियो यांनी केलेल्या विधानावर दोन्ही देशातील संबंध पुन्हा सुधारण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.
‘भारत अमेरिकेसाठी महत्त्वाचा’ ; जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर मार्को रुबियो यांचे महत्त्वपूर्ण विधान
मार्को रुबियो यांनी एस. जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर भारत अमेरिकेसाठी धोरणात्मक भागीदार म्हणून अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी मुलाखतीवेळी भारतावरील करावरही टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, सध्या भारत आणि अमेरिका संबंधात सुधारणा होण्याची आशा आहे. रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर कर लादण्यात आला होता, पण लवकरच यावर चर्चा होईल आणि २५ टक्के कर निश्चित केला जाईल.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि भारतामधील आर्थिक संबंध, स्थिर करण्याचा हेतू स्पष्ट केला. दोन्ही देशांतील संरक्षण, व्यापार, उर्जा, औषधनिर्मिती आणि खनिज क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर रुबियो आणि जयशंकर यांनी चर्चा केली. तसेच मार्को रुबियो यांनी भारत हा धोरणात्मक दृष्टीकोनातून अमेरिकेसाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले.
शिवाय यापूर्वी भारताच्या एका शिष्टमंडळाचा अमेरिकेला दौरा झाला होता. या सर्व घडामोडींमुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध स्थिर होण्याच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खेरदीमुळे भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केले होते. यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाल होता. पण पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच एस. जयशंकर यांचा अमेरिका दौरा देखील यशस्वी ठरला. सध्याची परिस्थिती पाहात दोन्ही देशातील ताणले गेलेले संबंध पुन्हा सुरळित होताना दिसत आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीची अटकळ बांधली जात आहे. पण अद्याप यावर दोन्ही देशांनी कोणतेही अधिकृत विधान दिलेली नाही. यामुळे अनिश्चितता कायम आहे.
भारत आणि अमेरिका संबंधात तणाव का आला होता?
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केला होता यामुळे भारत आणि अमेरिका संबंध ताणले गेले.
काय आहे दोन्ही देशातील सद्य परिस्थिती?
सध्या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये टॅरिफच्या मुद्यावर चर्चा सुरु आहे. दोन्ही देशात संबंध स्थिर करण्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत.