भारत-पाकिस्तान संबंधात तुर्कीच्या एर्दोगानची पुन्हा लुडबूड; संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्द्यावर केले भाष्य, म्हणाले.., (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Turkey on India-Pakistan Kashmir Dispute : इस्तंबूल : मंगळवारी (२३ सप्टेंबर)न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेचे(UNGA) ८० वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात जगभरातली अनेक देशांचे मंत्री उपस्थित होते. यावेळी तुर्कीचे (Turkey) राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगानही उपस्थित होते. यावेळी त्यांनी इस्रायल आणि हमास युद्धावर (Israel Hamas War) आले मत मांडले. तसेच त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या संबंधावरही भाष्य केले.
एर्दोगान यांनी पाकिस्तानच्या बाजूने भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, एप्रिलमध्ये भारत आणि पाकिस्तानध्ये युद्ध (India Pakistan War) सुरु होते, पण आता दोन्ही देशांतील तणाव निवळला असून याचा मला आनंद आहे.
एर्दोगान यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित करताना म्हटले की, काश्मीरमधील बूध-भगिनींसाठी हा मुद्दा सुयंक्त राष्ट्राच्या मदतीने सोडवला गेला पाहिजे. त्यांच्या या विधानानमुळे भारताने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.
#WATCH | New York | At the 80th session of UNGA, Turkish President Recep Tayyip Erdoğan says, “… We are pleased with the ceasefire achieved following the tensions last April between Pakistan and India, which had escalated into a conflict… The issue of Kashmir should be… pic.twitter.com/YqWx3l5X1C — ANI (@ANI) September 23, 2025
तुर्की हा पाकिस्तानचा मित्र राष्ट्र आहे. भारत पाकिस्तान युद्धातही तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. तसेच तुर्कीने काश्मीर मुद्याला देखील अनेक वेळा हात लावला आहे. भारताने यावर प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर कोणत्याही बाह्य देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. तसेच दुसऱ्या देशांच्या अतंर्गत बाबींवर लक्ष देण्याऐवजी सीमापार दहशतवादाला रोखण्यावर संयुक्त राष्ट्राने विचार करण्याचे आवाहन भारताने केले.
पण तुर्कीने पुन्हा एकदा या मुद्याला संयुक्त राष्ट्रात उपस्थित करुन खळबळ उडवली आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेनंतर एर्दोगान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली. यावेळ काश्मीर मुद्यावर तुर्कीचा पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा राहिल असे त्यांनी म्हटले. यासाठी तुर्की सर्वोतोपरी प्रयत्न करेल अशी हमीही दिली.
पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत पाकिस्तान युद्धात तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दर्शवला होता. तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन, शस्त्रे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत पुरवली होती.
भारत पाकिस्तानमधील काश्मीर मुद्यावर तुर्कीने काय म्हटले?
भारत पाकिस्तानच्या काश्मीर मुद्यावर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी भाष्य केले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्राला काश्मीरमधील बूध-भगिनींसाठी मुद्दा सोडवण्याचे आवाहन केले आहे.
भारताची एर्दोगान यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया होती?
भारताने एर्दोगान यांच्या काश्मीरच्या विधानावर भूमिक मांडताना म्हटले की, काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा आहे. यावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.
‘आम्ही झुकणार नाही…’ ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार