
India US Trade Deal
एक्सिओसने दिलेल्या वृत्तानुसार, टेड क्रूझ काही देणगीदारांशी भारताशी व्यापार कराराच्या मुद्यावरुन चर्चा करत होते. यावेळी त्यांनी मान्य केले की, भारतासोबतचा व्यापार करार पूर्ण करण्यासाठी काही अडथळे येत आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, यावरुन ट्रम्प प्रशासनात अंतर्गत वाद सुरु आहे. तसेच यासाठी क्रूझ यांनी उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि पीटर नवारो यांना जबाबदार धरले. तसेच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनाही यासाठी जबाबादार धरण्यात आले आहे.
सिनेटर टेड क्रूझ यांनी असेही म्हटले की, क्रूझ आणि इतर काही रिपल्बिकन सिनेटरने ट्रम्प यांना लिबरनेशन डे टॅरिफ लावण्यापासून विरोध केला होता. क्रूझ यांनी इशारा दिला होता की उच्च टॅरिफमुळे महागाई वाढेल ज्याचा सर्वाधिक फटका अमेरिकन ग्राहकांना होईल. परंतु ट्रम्प यांनी याकडे दुर्लक्ष केले. ट्रम्प भारतासोबतच्या व्यापार करारापेक्षा टॅरिफ धोरणांना अधिक महत्व देत आहे.
ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणानुसार, भारताकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर सवलतीमुळे अमेरिकेन उद्योगधद्यांचे नुकसान होत आहे. याचा केवळ भारताला फायदा होत आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील व्यापार चर्चा निष्फळ ठरत आहे. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर ५०% शुल्क (Tariff) लादले आहे. टॅरिफ लागू होण्यापूर्वी दोन्ही देशात व्यापार कराराला सुरुवात झाली होती. परंतु अद्याप ठोस करार झालेला नाही. आणखी एक कारण म्हणजे रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे देखील ट्रम्प नाराज होते, ज्यामुळे व्यापार चर्चेत अडथळा येत होता. परंतु असे असूनही ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्यांचे चांगले मित्र असल्याचा दावा करत होते.
In a Leaked conversation of US Senator Ted Cruz with donors said he was “battling” the WH to accept a trade agreement with India. Ted Cruz mentioned Peter Navarro, JD Vance and “sometimes” Trump himself were resistant to getting the Trade Deal done.
Pic: AI depiction pic.twitter.com/POpXuUjNF6 — खोटा_सिक्का™ (@Gk_India33) January 25, 2026
भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल? जाणून घ्या टॅरिफबाबत काय सांगतात तज्ज्ञ
Ans: रिपब्लिकन सिनेटर ट्रेड क्रूझ यांच्या लीक झालेल्या ऑडिओनुसार, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स, व्यापार सल्लागार पीटर नवारो आणि स्वत: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे भारत-अमेरिका व्यापार करार रखडला आहे.
Ans: दोन्ही देशातील व्यापार करार रखडल्यामुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर जास्त टॅरिफ आकारले जाईल. याचा फटका उद्योग आणि ग्राहकांना बसेल. दोन्ही देशाच्या आर्थिक आणि व्यापारी संबंधात नकारात्मक परिणाम होऊ शकतो.