'भारतात एवढी हिंमत नाही...' ; LeT च्या दहशतवाद्याने भारताला उघड धमकी देत केलं भडकाऊ भाषण, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर?
या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी अब्दुल रौफने भारताविरोधी गरळ ओकली आहे. त्याने दिल्ली बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. तसेच भारताच्या S-400 राफेल लढाऊ विमानाची खिल्ली उडवली आहे. रौफ हा लष्कर प्रमुख हाफिज सईच्या जवळचा मानला जातो. ऑपरेशन सिंदूरनंचर रोफ दहशतवाद्यांच्या कबरीवर दिसला होता. यावेळी अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी देखील उपस्थित होते. त्याने भारताकडे गेल्या ५० वर्षापासून पाकिस्तानला पाहण्याची हिंमत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला आहे की,जगभरातील देशांमध्ये केवळ पाकिस्तानकडेच अण्वस्त्रे आहेत.
दहशतवादी रौफने भारताची राजधानी काबीज करण्याचा दावा व्हिडिओमध्ये केला आहे. शिवाय त्याने काश्मीरविरोधात भडकाऊ व्यक्तव्य केले आहे. काश्मीरमध्ये हिंसाचार सुरुच राहिले असे रौफने म्हटले आहे.
शिवाय काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लष्कराकडून देखील भारताला धमकी मिळाली होती. पाकिस्तानच्या संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून नुकेतच असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर त्याच्या हाती पाकिस्तानच्या भू-दल, हवाई-दल, आणि नौदलाची ताकद हाती आली आहे. तसेच अण्वस्त्रांचा रिमोट देखील हातात आला आहे, नवे CDF म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुनीरने देखील भारताविरोधी गरळ ओकत हल्ल्याची धमकी दिली होती. यामुळे रौफच्या या व्हिडिओने खळबळ माजवली आहे.
सध्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची कोणतीही पुष्टी झालेली नाही, मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील दहशतवाद्यांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
आतंकी अब्दुल रऊफ है, जो लश्कर-ए-तैयबा के संस्थापक हाफिज सईद का करीबी सहयोगी और अमेरिका द्वारा प्रतिबंधित आतंकवादी है। अपने भाषण में रऊफ ने भारत पर हमलों की खुली वकालत कर उत्तेजक अंदाज़ में कहा कि “दिल्ली को दुल्हन बनाया जाएगा”।#ThankYouCena pic.twitter.com/WGt8y0J9pS — Shukla_AJ (@Tamoghn_Tejas) December 14, 2025
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






