
India China Tension
चीनने नुकतेच अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलून यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये चीनने अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिब्बत म्हटले असून चीनच्या नकाशात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांच्या मते, चीन (China) असे करुन एक सायकॉलॉजिकल वॉरफेअरची घोषणा करत आहे. याद्वारे जागतिक स्तरावर आपला खोटा दावा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
चीनच्या या कृतीवर बारताने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आक्रमक भूमिका घेत ड्रॅगनला सुनावले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी म्हटले की, चीनने कितीही काल्पनिक नावे ठेवली, नवे नकाशे बनवले तरी अरुणचाल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहिल. अशा आधारहीन आणि आक्रमक कृतीने काहीही साध्य करता येणार नाही असे जयस्वाल यांनी ठणकावून सांगितले आहे.
नुकतेच ०९ एप्रिल २०२६ रोजी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टिनंट जनरल केटी परनाईक यांनी तवांगमधील नियंत्रणे रेषेवरील चौक्यांना भेट दिली होती. भारतीय लष्कर आणि ITBP च्या जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा दौरा होता. या दौऱ्यामुळे चीन बिथरला असून भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे.
चीनने अशा प्रकारे नावे बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१७ आणि २०२१ मध्येही चीनने असे चिथावणीखोर कृत्य केले होते. त्यावेळी देखील भारताने चीनला सडेतोड उत्तर दिले होते. परंतु चीन काही सुधारण्याचे नाव घेईना. चीनचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन मानले मानले जात आहे.
भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की, भारत आपल्या प्रादेशिक अखंडत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. चीनने पुन्हा असे कृत्य केल्यास त्याला चोख उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत असे भारताने स्पष्ट केले आहे.
भारताला धक्का! इराणहून येणारा ६ लाख बॅरल तेलाचा टँकर अचानक चीनकडे वळाला; काय आहे प्रकरण?
Ans: चीनने भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलली आहे.
Ans: भारत सरकारने चीनला सडेतोड उत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहिल असे स्पष्ट शब्दात भारताने सांगितले आहे. तसेच चीनने कितीही नावे बदलली, नकाशे तयार केली तरी यातून त्यांना काहीही साध्य होणार नाही हे भारताने म्हटले आहे.