
Indian Embassy Iran
तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी सूचना जारी केला आहेत. या सूचनांमध्ये दूतावासाने पर्यटकांना व्यावसायिक उड्डाणांसह उपलब्ध असलेल्या पर्यायांचा वापर करत इराण सोडण्याचा सल्ला दिला आहेत. सध्या इराणमधील परिस्थिती भयकंर झाली असल्यानेच हा इशारा जारी करण्यात आला आहे. शिवाय इराणविरोधी अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याची शक्यताही वाढली आहे. यामुळे दूतावासेन भारतीय नागरिकांना सर्तक राहण्याचे आणि अशांततेच्या प्रदेशात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
जास्त घातक परिस्थिती असल्यास एखाद्या सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचे आदेश दिले आहे. दूतावासाने आवाहन केले आहे की, सर्व भारतीय नागरिकांनी आणि पीआयओंनी सावधरिगी बाळगावी. तसेच आंदोलन सुरु असलेल्या प्रदेशांपासून दूत राहावे. सध्या इराणमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कता रहावे आणि कोणतीही अडचण आल्यास मदतीसाठी संपर्त करावा. तसेच स्थानिक माध्यमांकडेही लक्ष द्यावे असे दूतावासाने म्हटले आहे.
pic.twitter.com/5LnD6gC0tu — India in Iran (@India_in_Iran) January 14, 2026
सर्व कागपत्रे सुरक्षित ठेवण्याच सल्ला
याशिवाय दूतावासाने भारतीयांना त्यांचे प्रवास आणि इमिग्रेशन कागपत्रे, पासपोर्ट आणि ओळखपत्रे जवळ ठेवण्यास सांगितली आहे. तसेच गरज पडल्यास दूतावासाशी संपर्क साधावा असेही म्हटले आहे. यासाठी दूतावासाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. अधिकृतद वेबसाईटवर हा क्रमांक देण्यात आला आहे. दरम्यान याच वेळी भारतातील नागरिकांना सरकराने देखील इराण आणि मध्य पूर्वेच्या आसपासच्या देशांमध्ये प्रवास टाळण्याचाही सल्ला दिला आहे.
इराणमधील निदर्शने का सुरु आहेत?
इराणमध्ये २८ डिसेंबर २०२५ रोजी खामेनेई सरकारविरोधात तीव्र निदर्शने सुरु झाला होती. सुरुवातील यामागे देशांतर्गत वाढते आर्थिक संकट, वाढती महागाई, इराणच्या चलन रियालची घसरण ही कारणे होती. परंतु सरकारने आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर केल्याने हे आंदोलन अधिक चिघळले आहे. खामेनेई सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आणि राजेशाहीच्या समर्थनार्थ हे आंदोलन पेटेल आहे. याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटला आहे. जगभरात इराणी नागरिकांच्या समर्थनार्थ आंदोलने केली जात आहेत.