Iran Protest : अमेरिकाच कारणीभूत? इराणी सरकारचे अचानक बदलले सूर, निदर्शकांना पाठिंबादेत ट्रम्पवर हल्लाबोल
दरम्यान पेझेश्कियान यांनी पहिल्यांदाच निदर्शकांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर आम्ही लोकांचा आवाज ऐकला असता तर आज ही निदर्शन झाली नसती. समाजातील प्रत्येक घटकाचे मत महत्वाचे असल्याचे पेझेश्कियान यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावर तोडगा काढणे महत्वाचे असल्याचेही म्हटले आहे. पेझेश्कियान यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे. सरकारचे सूर अचानक कसे बदलले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पेझेश्कियान यांनी इराणमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलला बाहेरुन देशात अस्थिरता पसरवण्याचे कार्य करत आहे. त्यांनी हल्लेखोरांना आणि दहशतवाद्यांना इराणी समाजात अराजकता निर्माण केली असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अमेरिकेच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिका हल्लखोरांना इराणमध्ये हिंसा घडवण्याचे आदेश देत आहे. यामुळे इराणी नागरिकांनी अशा हल्लेखोर आणि दहशतवाद्यांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मसूद पेझेश्कियान यांनी इराणी जनतेला आश्वासन दिले आहे की, सरकार त्यांच्या मागण्या आणि चिंता सोडवले. त्यांनी असाही इशारा दिला आहे की, हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांना आता कोणत्याही प्रकारचा हिंसाचार पसरवू दिला जाणार नाही. लोकांना न्याय हवा आहे हे सरकारच्या लक्षात आले आहे. आम्हाला त्यांची काळजी समजते. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले की सरकार निदर्शकांशी वाटाघाटी करण्यास तयार आहे. निदर्शकांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या जातील आणि त्या सोवण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी म्हटले.
सध्या इराणमध्ये इराफन सोलतानी याच्या फाशीच्या निर्णयामुळे तीव्र संतापाचे वातावरण आहे. इराफान हा खामेनेई सरकारविरोधात आंदोलनात सहभागी झाला होता. यावेळी सुरक्षा दलांच्या कारवाई ८ जानेवारी २०२६ ला त्याला अटक करण्यात आली. यानंतर दोन दिवसांनीच त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. मानवाधिकार संघटनांनी याचा तीव्र निषेध केला आहे. इराणच्या या निर्णयाला मानवी हक्कांचे उल्लंघन म्हटले आहे.
इराणमधील उठावाचे पॅरीस कनेक्शन! कोण आहेत ‘Madam M’? ज्यांच्यामुळे उडाली खामेनी सरकारची झोप
Ans: राष्ट्राध्यक्ष मसूद यांनी अचानकपणे आपले सूर बदलले असून आंदोलकांनाच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहेत. तसेच त्यांनी लोकांचे ऐकले असते तर अशी परिस्थिती आली नसती असे म्हटले आहे.
Ans: पेझेश्किया यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायल आणि अमेरिका बाहेरुन इराणमध्ये अस्थिरचा पसरवण्याचा कट रचत असल्याचे म्हटले आहे.
Ans: सरकाने शांतेत आंदोलन करणाऱ्या आणि हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांमध्ये फरक असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या दंगेखोरांना हिंसा पसरवल्याच्या कारणाने कठोर शिक्षा दिली जाईल असे इराणी सरकारने म्हटले आहे,






