Indian Family disappears from Iran Embassy Takes Action
तेहरान: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणमधून एक भारतीय कुटुंब अचानक बेपत्ता झाले आहे. याची पुष्टी तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी (२८ मे) केली. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, एका बारतीय कुटुंबातील तीन सदस्य अचानक बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणावर भारताने इराणकडून उत्तर मागितले आहे. तसेच तात्काळ तापास करण्याचेही आवाहन केले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना भारत सरकारसाठी राजनैतिक दृष्ट्या आव्हान ठरत आहेत. या प्रकणामुळे विदेशात भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. दूतावासाने लवकरात लवकर भारतीय नागरिकांना शोधण्याचे आवाहन केले आहे.
दूतावासाने म्हटले की, बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. आम्ही कुटुबींयान हवी ती मदत पुरवत आहोत. तसेच इराणी अधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्यात आला असून कारवाईचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान तेहरानमदील भारतीय दूतावास इराणच्या अधिकाऱ्यांशी संपर्काच आहे. दरम्यान इराणच्या कोणत्या भागातून भारतीय नागरिक बेपत्ता झाले याबाबत अद्याप दूतावासाने काहीही स्पष्ट केलेले नाही. सध्या दूतावास प्रकणाशी संबंधित अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधत आहे. बेपत्ता नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दूतावासाचा प्रयत्न सुरु आहे.
— India in Iran (@India_in_Iran) May 28, 2025
भारतीय दूतावासाने नागरिकांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकणाला गांभीर्याने घेतले आहे. तसेच कुटुंबासोबतही वेळोवेळो माहिती शेअर केली जात आहे. दूतावासाने इराण प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे. दूतावासाने हे प्रकरण गांभीर्याने घेण्यास आणि बेपत्ता लोकांना लवकरात लवकर शोधण्यास सांगितले आहे. भारत सरकारचीही या प्रकरणावर नजर आहे.
या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. इराण आणि भारतामध्ये गेल्या अनेक काळांपासून ऐतिहासिक संबंध आहेत. यामुळे ही घटना दोन्ही देशांच्या संबंधासाठी अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.
इराण हा भारताचा महत्त्वपूर्ण व्यापारी भागीदार आहे. भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. याशिवाय भारताने इराणच्या चाबहार बंदर प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. इराणचे चाबहार बंदर भारतासाठी व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.