Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Tension : इराणमधून भारतीयांची ‘घरवापसी’! युद्धाच्या खाईतून मच्छिमारांची सुटका; ‘या’ देशाचे मानले जयशंकर यांनी आभार

Indian Citizens Returns Safely form Iran : पश्चिम आशियातील तणावादरम्यान भारताचा मोठा कूटनीतिक विजय झाला आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. ३१२ मच्छिमारांना सुखरुप परत आणण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 11, 2026 | 03:52 PM
Indian fishermen safely evacuated from Iran

Indian fishermen safely evacuated from Iran

Follow Us
Follow Us:
  • इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका
  • ३१२ मच्छिमार सुखरूप मायदेशी परतले
  • जयशंकर यांनी आर्मेनियाचे मानले आभार
Indian fishermen safely evacuated from Iran : नवी दिल्ली/तेहरान : अमेरिका इराण मधील शांतता चर्चांदरम्यान भारतासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी सुरु झाली असून ३१२ मच्छिमारांना सुखरुप मायदेशी आणण्यात आले आहे. हा भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. जयशंकर यांनी याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

US Iran Peace Talks : रक्ताळलेले दप्तर अन् शूज…; शांतता चर्चेपूर्वी इराणकडून आक्रोश व्यक्त, हृदयद्रावक फोटो केला शेअर

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (११ एप्रिल) भारत सरकारने राबवण्यात आलेल्या रेस्क्यू मोहिमेअंतर्गत ओर्मेनियाच्या मार्गे ३१२ मच्छिमारांना सुखरुप परत आणले आहे. इराणमधील बिघडलेली परिस्थिती आणि इंटरनेंट बंदीमुळे थेट संपर्क साधणे कठीण झाले होते. परंतु परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी केलेल्या राजनैतिक हालचालींमुळे भारतीयांची मायदेशी वापसी झाली आहे. जयशंकर यांनी यासाठी आर्मेनिया सरकार आणि समकक्ष अरारात मिर्झोयान यांचे आभार मानले आहेत.

Another 312 Indian fishermen safely evacuated from Iran to India through Armenia. Thank the Government of Armenia and my friend @AraratMirzoyan for making it possible. @MFAofArmenia — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) April 11, 2026

इस्लामाबादमध्ये चर्चेला सुरुवात

याच वेळी दुसरीकडे इस्लामाबादमध्ये पाकिस्तान(Pakistan) च्या मध्यस्थीने अमेरिका इराण शांतता चर्चेला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने इराणच्या शिष्टमंडळाशी संवाद सुरु केला आहे. इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिफब करत आहे. या चर्चेत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील महत्त्वाचे नेते अली अकबर अहमदियन यांचा समावेश आहे.

यानंतर पाकिस्तान अमेरिकेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असून याचे नेतृत्त्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस करत आहे. या चर्चेपूर्वी जेडी वेंस यांनी इराणला उघड इशारा दिला होता. इराणने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही किंवा अमेरिकेची फसवणूक केली तर त्यांना मदत केली जाणार नाही.

सध्या दोन्ही देशांनी एकमेकांसमोर अत्यंत कडक अटी ठेवल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला करण्यास, अण्वस्त्र कार्यक्रम नष्ट करण्यास आणि युरेनियमचे संवर्धन पूर्णपणे थांबवण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे इराने देखील १० अटी ठेवल्या आहेत. तसेच अमेरिकेवर विश्वास नसल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे. सध्या या चर्चेचा निकाल संपूर्ण जगासाठी अत्यंत निर्णयाक मानला जात आहे. ही चर्चा यशस्वी व्हावी अशी जगभरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

US Iran Peace Talks : ‘आम्हाला फसवलं तर…’, शांतता चर्चेपूर्वी अमेरिकेचा इराणला उघड इशारा; इस्लामाबादमध्ये आज होणार बैठक

Web Title: Indian fishermen safely evacuated from iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • S. Jaishankar
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
1

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून
2

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
3

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य
4

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.